शेतात बेकायदा वाळू साठा केल्याप्रकरणी महिलेविरुद्ध पारनेर तालुक्यात गुन्हा

मार्तंड बुचुडे
Wednesday, 2 September 2020

पळशी येथे सरकारचा वाळू ऊपसाबाबतचा परवाना नसताना एक लाख ६८ हजाराचा सुमारे ४० ब्रास वाळूचा उपसा करून तिची विक्री करण्याच्या उद्देशाने साठाकरून ठेवल्याचे कारणातून एका महिलेच्या विरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारनेर (अहमदनगर) : पळशी येथे सरकारचा वाळू ऊपसाबाबतचा परवाना नसताना एक लाख ६८ हजाराचा सुमारे ४० ब्रास वाळूचा उपसा करून तिची विक्री करण्याच्या उद्देशाने साठाकरून ठेवल्याचे कारणातून एका महिलेच्या विरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पळशी येथील गट न. ६१७ मध्ये एका महिलेनी कोणताही वाळू ऊपसाबाबतचा परवाना व वाळू ऊपशाचा अधिकृत लिलाव झालेले नसतानाही कोणत्या तरी नदी पात्रातून स्वत: च्या फ़ायदयासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने वाळूचा ऊपसा करुन बेकायदा साठा केला आहे. याबाबतची फिर्याद पळशीचे गाव कामगार तलाठी राम पाराजी शिरसाठ यांनी दिली.

त्यानुसार पारनेर पोलिस ठाण्यात जमीन महसूल अधिनियम ४८ प्रमाणे अवैध गौण खनिज उतखनन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलिस करत आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime against a woman in Parner taluka for illegal storage of sand in a field