crime : कुख्यात नईमचा मध्यरात्रीच गेम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Crime : कुख्यात नईमचा मध्यरात्रीच गेम

चांदुर रेल्वे : अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याच्या घटनेला मध्यरात्री वेगळेच वळण मिळाले. तीन दिवसांपासून हे प्रकरण शहरात चांगलेच गाजत आहे. पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीला घरी परत सोडताना नईम याचा अज्ञातांनी हल्ला करून खून केला. त्यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

मुलीला परत आणून देण्यासाठी काल नागरिकांनी पोलिस स्टेशनला २४ तासांचे अल्टिमेटम दिले होते. अपहरणासह अनेक गुन्हे दाखल असलेला गुंड नईम खान हा गारुडीपुरा, शिवाजी नगरसह अनेकांची डोकेदुखी ठरत होता. अनेक बेकायदेशीर कामे त्याच्याकडून व त्याच्या साथीदारांकडुन होत होती.

२१ सप्टेंबरला त्याने परिसरातीलच एका अल्पवयीन मुलीला तिच्या आई व बहिणींसमोर चाकूचा धाक दाखवून जबरीने फिल्मस्टाईल पळवून नेले होते. त्याला अटक करून मुलीला परत आणून द्यावे यासाठी गुरुवारी (ता.२२) परिसरातील शेकडो नागरिकांनी व समाजबांधवांनी पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला होता. त्यावरून पोलिसांचा तपास सुरू असतानाच गुरुवारी (ता.२२) मध्यरात्री नईमचा अज्ञातांनी खून केल्याची घटना घडली.

यावरून शहरात एकच खळबळ उडाली आहे. मुलीला त्याने परत तिच्या घरी सोडले, त्यावेळी तो एकटा होता. तो आल्याची माहिती मिळताच संतप्त लोकांनी त्याच्यावर हल्ला चढविला व त्याचा खून केल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा ताफा परिसरात दाखल झाला होता. त्याचा खून कसा झाला याचा तपास पोलिस करित आहेत.

Web Title: Crime Infamous Naeems Midnight Game Kidnapped

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..