वनकाठीचे जनक, ज्येष्ठ पर्यावरणवादी बलभीमअण्णा डोके यांचे निधन 

Death of Balbhimanna Doke
Death of Balbhimanna Doke

नगर ः ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते व सामाजिक कार्यकर्ते बलभीम शांताराम डोके (वय 63) यांचे आज रात्री अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर येथील अमरधाम स्मशानभूमीत रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. 

बलभीमअण्णा या नावाने ते सर्वत्र परिचित होते. (कै.) डोके यांच्या मागे भाऊ व दोन मुलगे असा परिवार आहे. मूळचे बीड जिल्ह्यातील देवळाली पानाची (ता. आष्टी) येथील रहिवासी असलेले अण्णा राजकारण, समाजकारण व शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते. नगर व बीड जिल्ह्यात त्यांचा मोठा लोकसंग्रह होता. पर्यावरण रक्षणासाठी ते अखेरच्या क्षणापर्यंत झटत राहिले. डोंगरमाथ्यापासून ते शेतापर्यंत बीजरोपणासाठी त्यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली वनकाठी राज्यभर चर्चेचा विषय ठरली. पर्यावरण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल राज्य सरकारने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देऊन गौरविले होते. 

कोरोनावर झाडपाल्याच्या माध्यमातून औषधनिर्मिती करण्यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यासंदर्भात त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांकडे पाठपुरावाही चालविला होता. सौ. लक्ष्मीबाई शांताराम डोके समाज विकास प्रतिष्ठानाच्या माध्यमातून बलभीमअण्णा यांनी नगर व बीड जिल्ह्यात शाळा, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये उभी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य म्हणून डोके अण्णा कार्यरत होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ख्याती होती. ज्येष्ठ नेते बापूसाहेब डोके यांचे ते बंधू, तर ऍड. प्रसाद व ऍड. शिवजित डोके यांचे वडील होत. अहमदनगर 
....... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com