सोशल मीडियावरील अकाउंटद्वारे बदनामी

सायबर पोलिसांकडून पाच जणांना अटक
Social Media Defametion
Social Media DefametionSakal

अहमदनगर - मागील काही दिवसांपासून शहरात सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. नुकतेच सायबर पोलिस ठाण्याकडून पाच आरोपींना जेरबंद करण्यात आले. त्यात एक पुरुष, तीन महिला आरोपींसह एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे.

२६ मार्चला एका महिलेने पोलिस ठाण्यात तिच्या नावाचे बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून त्यावरून अश्‍लिल मजकूर प्रसारित केला जात आहेत, अशी तक्रार सायबर पोलिस ठाण्यामध्ये नोंदविली होती. त्यानंतर २६ मार्च, ३० मार्च, पाच एप्रिल, १६ मे या दिवशीही या सारख्याच तक्रारी महिला फिर्यादींनी पोलिस ठाण्यात नोंदविल्या. या प्रकारानंतर सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई केली. किरण अंकुश थोरात (रा. कर्जत) यांना पकडण्यात पथकाला यश मिळाले. त्यानंतर तीन महिला आरोपी, एक अल्पवयीन आरोपी ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले व सायबर पोलिस गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com