
उत्तर विभागीय कार्यालय सुरु करण्याची मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजीत श्रीगोड यांनी परिवहन महामंडळाचे नुतन व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्याकडे केली आहे.
श्रीरामपूर (अहमदनगर) : पुढील काळात येथील एसटी कार्यशाळेचा विस्तार करुन उत्तर विभागीय कार्यालय सुरु करण्याची मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजीत श्रीगोड यांनी परिवहन महामंडळाचे नुतन व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्याकडे केली आहे.
प्रवासी संघटनेच्या मागण्या जाणुन घेण्यासाठी चन्ने यांनी नुकतीच बैठक घेतली. बैठकीला प्रदेश प्रवासी महासंघाचे सहसचिव बाबासाहेब भालेराव, संजय सुपेकर, विजय गिते, दादासाहेब महाजन, सचिन भुजबळ, दिलीप जाधव उपस्थित होते. बैठकीत श्रीगोड यांनी एसटी बस प्रवाशांच्या आणि जनतेच्या अपेक्षासह विविध सुचना मांडल्या. एसटी महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष स्व. गोविंदराव आदिक यांनी शहरातील एमआयडीसीमध्ये विभागीय एसटी कार्यशाळा सुरु करुन नगर जिल्ह्यातील पाच डेपो कार्यशाळेला जोडले.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अपघातग्रस्त बसच्या दुरुस्तीसाठी यंत्र उभारणी केली. पुढील काळात टायर रिमोल्डींग कारखाना सुरु करुन स्वतंत्र विभागीय एसटी कार्यालय सुरु करुन प्रवासी सेवा वाढविण्याची मागणी श्रीगोड यांनी केली.
अधिकृत एसटी थांबा संदर्भातील तक्रारीकडे लक्ष द्यावे, बसेस नियमित वेळेवर सोडण्यात याव्या, एसटी बस स्थानक परिसर स्वच्छ ठेवावा, मुक्कामी बसेसाठी सुविधा उपलब्ध करण्यात याव्या, कुरियर सेवा सुविधा वाढविण्यात याव्या, महिला प्रवासी सुरक्षा वाढवावी, बसस्थानक परिसर आकर्षक करुन अद्यावयत वेळापत्रक लावण्यासह विविध मागण्या प्रवासी संघटनेच्या असल्याचे श्रीगोड यांनी चन्ने यांना बैठकीत सांगितले.
संपादन : अशोक मुरुमकर