रस्ता दुरुस्त करा अन्यथा न्यायालयात जाणार... कोणी दिलीय इशारा वाचा

Demand of the Parivartan team to repair the road from Devibhoyare to Nighoj
Demand of the Parivartan team to repair the road from Devibhoyare to Nighoj

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : देविभोयरे (ता. पारनेर) ते निघोज रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या खड्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा अन्यथा पारनेर परिवर्तन फाऊंडेशन कोर्टाचे दरवाजे थोठवावेल, असा इशारा फाऊंडेशनच्या सदस्यांनी दिला आहे.
परिवर्तनचे अध्यक्ष सचिन भालेकर आणि कार्यकारिणी सदस्य निघोजवरून चिंचोलीकडे वृक्षारोपणासाठी जात असताना देवीभोयरेच्या आधी कालव्याजवळ रस्त्यावर मोटारसायकलवर जाणाऱ्या एक जोडप्याचा अपघात झाला. थोडक्यात बचावलेल्या या जोडप्याला परिवर्तन टीमने प्रथमोपचार दिले. या घटनेनंतर या जखमी जोडप्यानी व प्रवाशांनी रस्त्यावर वृक्षारोपण करण्याची मागणी केली. सदस्यांनी लगेच सूचना अमलात आणत प्रशासनाला जाग आणण्यासाठी चिंचोली गावात होणाऱ्या वृक्षारोपण कार्यक्रमापूर्वी या रस्त्यावरच वृक्षारोपन केले. हा रस्ता दुरुस्तीची मागणी याआधी देखील परिवर्तन टीमने केली होती. परंतू प्रशासन याबाबत टाळाटाळ करत आहे.
या रस्त्याचे काम सुरू न झालेस पारनेर कोर्टात याबाबत याचिका दाखल करून न्याय मागितला जाईल. कारण नागरीकांच्या समस्यांची ना लोकप्रतीनिधी ना अधिकारी चिंता आहे. नागरिक मात्र वाऱ्यावर आहे. या अशा गोष्टींमुळे आम्हाला सध्या न्यायालय हाच आधार वाटत असल्याचे परिवर्तनचे मुख्य समन्वयक सुहास शेळके यांनी सांगितले. याबाबत तातडीने सर्व कागदपत्रे, कंत्राट दाराला दिलेल्या कामाच्या निवेडेचे कागदपत्र परिवर्तन टीमला पाहण्यासाठी उपलब्ध करावेत, अशीही मागणी त्यांनी केली. तालुक्याच्या जनतेच्या जीवाशी खेळ करणारे हे रस्ते दुरुस्त हिणार नसतील तर तालुक्यातील प्रत्येक रस्त्यावर कायमस्वरूपी वृक्षारोपण करण्यासाठी आंदोलन करणार असेलच परिवर्तन टीमने स्पष्ट केले. असाच प्रकार मांडवे खुर्द ते टाकळी ढोकेश्वर रस्त्यावर देखील घडला आहे. गेले अनेक महिने पडून असलेली खडी आणि कच यामुळे या रस्त्यावर अनेक जीवघेणे अपघात होत आहेत. ठेकेदार हे काम का करत नाही हे एक अगम्य कोडेच नागरीकाना पडले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन देऊनही काहीच कारवाई झाली. रस्ता दुरूस्त न झाल्यास या रस्त्यावर देखील वृक्षारोपण करण्यात येईल, असा इशारा भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे सदस्य राजु रोकडे यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com