Video : आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातून गेलेला महामार्ग गेला खड्ड्यात

अशोक मुरुमकर
Sunday, 12 July 2020

सोलापूर- अहमदनगर महामार्ग सध्या खड्ड्यात गेला आहे. चापडगावपर्यंत अहमदनगरच्या सार्वजिनक बांधकाम विभागाच्या हद्दीत हा महामार्ग असून कर्जत व श्रीगोंदा तालुक्यातून जात आहे. या महार्गाची सध्या खड्ड्याने चाळण झाली आहे. याकडे लोकप्रतिनिधींने त्वरीत लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. या महामार्गावर सतत लहान मोठे अपघात होत आहेत.

अहमदनगर : सोलापूर- अहमदनगर महामार्ग सध्या खड्ड्यात गेला आहे. चापडगावपर्यंत अहमदनगरच्या सार्वजिनक बांधकाम विभागाच्या हद्दीत हा महामार्ग असून कर्जत व श्रीगोंदा तालुक्यातून जात आहे. या महार्गाची सध्या खड्ड्याने चाळण झाली आहे. याकडे लोकप्रतिनिधींने त्वरीत लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. या महामार्गावर सतत लहान मोठे अपघात होत आहेत.

गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली आदी राज्यांना जोडणारा हा महात्त्वाचा महामार्ग आहे. अहमदनगर जिल्ह्यात सुमारे ८० किलोमिटरची हद्द या महामार्गाची आहे. अहमदनगर व सोलापूरसह इतर राज्यांना जोडणारा महत्त्वाचा महामार्ग असल्याने येथून मोठ्याप्रमाणात जड वाहतूक सुरु असते.

Image may contain: one or more people, outdoor and nature

मोठ्याप्रमाणात वाहतूक होत असताना सुद्धा या महामार्गावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. चापडगावपासून पुढे हा महामार्ग सोलापूर जिल्ह्यात जातो. सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत या महामार्गाचे काही ठिकाणी चौपदरीकरण झालेले आहे. मात्र, नगर जिल्ह्यात मात्र दुहेरीकरणाचाच रस्ता आहे. या महामार्गावर चापडगावपासून नगरपर्यंत खड्डे आहेत. त्यामुळे सुमारे ८० किलोमीटरच्या प्रवासासाठी अडीच ते तीन तास लागतात. या महामार्गावर चापडगाव, माहीजळगाव, मिरजगाव, घोगरगाव अशी मोठी गावे आहेत. या गावाच्या प्रवेशद्‌वाराजवळ तर खड्डे आहेतच शिवाय इतर ठिकाणी सुद्धा

Image may contain: sky, car and outdoor

मोठ्याप्रमाणात खड्‌डे आहेत. खड्ड्यांमुळे गाड्यांचे मोठे नुकसान होत आहे. याबरोबर आरोग्यावरही परिणाम होत आहे. आमदार रोहित पवार यांनी याकडे त्वरीत लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे. पावसाळ्यात किमान खड्डे तरी बुजावेत अशी अपेक्षा वाहनचालक करत आहेत.

आमदार रोहित पवार म्हणाले, अहमदनगर- सोलापूर मार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतर झालेला. त्याच्या भुसंपादनाचे काम जुलैअखेर पूर्ण होणार आहे. त्याबाबत नुकतीच बैठक झाली आहे. त्यामुळे त्यावर सरकारला खर्च करता येत नाही. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. कर्जत तालुक्याच्या हद्दीत हा महामार्ग ४२ किलोमीटर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for repair of Solapur Ahmednagar highway