श्रीगोंदे उपनगराध्यक्ष निवडीचं भाजपात जरा अवघड दिसतंय

Deputy mayor election in Shrigonda postponed
Deputy mayor election in Shrigonda postponed

श्रीगोंदे : नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अशोक खेंडके यांनी राजीनामा देवून वीस दिवस झाले. मात्र, अजून पालिकेला नवा उपनगराध्यक्ष मिळालेला नाही. या पदासाठी भाजपकडून अनेकजण बाशिंग बांधून अाहेत. 

कोरोनामुळे निवड सध्या होणार नसल्याचे समोर येत आहे. पालिकेत भाजपाचे स्पष्ट बहुमत अाहे. खेंडके यांचा राजीनामा घेण्यात भाजपाने घाई तर केली नाही ना अशी चर्चा सुरु आहे.

श्रीगोंदे नगर पालिकेची निवडणूक पंधरा महिन्यांपूर्वी झाली होती. तत्कालिन आमदार राहूल जगताप व काँग्रेसचे राजेंद्र नागवडे आघाडीकडून एकत्र निवडणूक लढले होते. विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हे भाजपाच्या झेंड्याखाली समर्थक मैदानात होते. त्यावेळी जनतेतून काँग्रेसच्या शुभांगी पोटे यांनी बाजी मारली तर पालिकेत भाजपाचे बहुमत आले.

पालिकेत उपनगराध्यक्षपद देताना वर्षासाठी खेंडके यांना दिले होते. त्यामुळे त्यांनी नेत्यांच्या आदेशानुसार राजीनामा दिला. मात्र आता कोरोना लाॅकडाऊनमुळे निवडणूक होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पालिका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना मेल पाठवून निवडणूकीबाबत तयारी दाखविली आहे मात्र अजुन जिल्हा प्रशासनाकडून त्यांना हिरवा कंदील मिळालेला नाही.

विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या नगराध्यक्ष पोटे यांनी भाजपात प्रवेश केला होता. आता त्या पुन्हा काँग्रसच्या गोटात दिसत आहेत. त्यामुळे त्या नेमक्या कुठे आहेत असा प्रश्न पडला असला तरी त्यांनी, काँग्रेसच्या चिन्हावर जिंकले अाहे. त्याच पक्षात असल्याचे स्पष्ट करीत सगळ्या शंकाना संपुष्टात आणले.

पालिका सभागृहात भाजपाचे अकरा तर नगराध्यक्षासह आघाडीचे नऊ सदस्य आहेत. पोटे यांनी त्यांचा गट आघाडीसोबत असून भाजप त्यांचा विरोधक असल्याचे सांगितल्याने उपनगराध्यक्षपदाच्या निवडीत काही होवू शकते अशी शंका आहे. पण त्यासाठी अजून किती दिवस थांबावे लागेल, हे सांगत येत नाही.

लाॅकडाऊनमध्ये निवडणूक कधी घ्यायची हे जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती असल्याने निवडणूकीत रंगत आणण्यासाठी हा कालावधी भाजपासाठी कसोटीचा होवू शकतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com