मंदिरातील चांदीच्या पादुकांच्या चोरीचा तपास लावणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे भाविकांने मानले आभार 

सनी सोनावळे
Monday, 21 September 2020

पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील कोरठण खंडोबा देवस्थान मंदिर परिसरातील आवारामध्ये चांदीच्या पादुका चोरांनी चोरून नेल्या होत्या याप्रकरणी पोलिसांनी तपास लावला असुन आरोपीला अटक केली आहे.

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील कोरठण खंडोबा देवस्थान मंदिर परिसरातील आवारामध्ये चांदीच्या पादुका चोरांनी चोरून नेल्या होत्या याप्रकरणी पोलिसांनी तपास लावला असुन आरोपीला अटक केली आहे.चोरीला गेलेल्या पादुका पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत यामुळे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड, विश्वस्त मंडळ व भाविक यांनी पोलीस यंत्रणेचे आभार व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रातील राज्यस्तरीय ब वर्गात समावेश असणारे मोठ्या संख्येत भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या कोरठण खंडोबा देवस्थान येथील मंदिरासमोर च्या चांदीच्या पादुका 21 जुलै रोजी पहाटे 3 वाजता दोन चोरांनी चोरून नेल्या होत्या त्यानंतर राहता येथील वीरभद्र महाराज मंदिरातील चांदीच्या मौल्यवान मूर्ती ऐवजांच्या झालेल्या धाडशी चोरीचा तपास लावताना पोलिसांना कोरठण खंडोबा येथील चोरीला गेलेल्या पादुकांच्या चोरीचाही तपास एकाच चोराकडे लागला आहे 

आरोपी भास्कर खेमाजी पथवे (वय 42 वर्षे, रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर) यास ताब्यात घेतले. त्यास जंगलामधून बाहेर आणून विश्वासात घेवून गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सुरुवातील उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदाराचे मदतीने केला असल्याचे सांगीतले. त्यावरुन साथीदार आरोपीचा शोध घेतला.परंतू तो मिळून आला नाही.यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी (ता 18) रोजी पोलिसांनी हस्तगत केला आहे पोलिसांच्या या कामगिरीबद्दल देवस्थान ट्रस्ट व भाविकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devotees thank police officers for investigating the theft of silver from the temple