कोरोनाला न जुमानता भाविकांनी घेतले कळसुबाईचे दर्शन

शांताराम काळे
Saturday, 24 October 2020

भाविक भक्तांच्या श्रद्धेने आज कोरोनालाही न जुमानता कळसूबाईचे दर्शन घेतल्याचे  चित्र पाहायला मिळाले.

अकोले (अहमदनगर) : भाविक भक्तांच्या श्रद्धेने आज कोरोनालाही न जुमानता कळसूबाईचे दर्शन घेतल्याचे  चित्र पाहायला मिळाले. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर विराजमान झालेल्या अकोले तालुक्यातील कळसुबाई देवी ही आदिवासी जनतेचे श्रद्धा स्थान आहे.

येथे दर्शनासाठी बंदी असताना केवळ श्रद्धेपोटी कोरोनाची भीती न बाळगता कळसुबाईच्या दर्शनासाठी जंगल रस्त्याने ना होईना पण आज कळसूबाईचे दर्शन घ्यायचे हे भक्तांनी दाखवून दिले.

नवरात्रोत्सवमधील सातवी माळ, आयुष्यभर कधी ही या दिवशी कळसुबाईचे दर्शन चुकविले नाही. मग कोरोना असला म्हणून काय झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व ती काळजी घेऊन जंगल रस्त्याने देवीच्या दर्शनासाठी गर्दी या उंच शिखरावर झाली होती.

एकीकडे महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंदिरे दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या बारी, जहागीरदारवाडी गावाने कळसूबाई मंदिर दर्शनासाठी बंद केलेले आहे. परंतु भक्तांना त्यांची कळसूबाई देवीवरील श्रद्धा गप्प बसू देईना व कोरोनाला न जुमानता जंगल रस्त्याने जाऊन आज सातव्या माळेच्या निमित्ताने अनेक भाविक भक्तांनी दर्शन घेतले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devotees visited Kalsubai despite the corona