सोनईत गडाख गटाचे धनंजय वाघ सरपंच, ऐनवेळी बदलला उमेदवार

Dhananjay Wagh Sarpanch of Sonai Gadakh group
Dhananjay Wagh Sarpanch of Sonai Gadakh group

सोनई (जि.अहमदनगर): जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या सोनई गावातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी धनंजय सखाराम वाघ तर उपसरपंचपदी प्रसाद हारकाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सतरा पैकी सोळा सदस्य गडाख गटाचे निवडून आले आहेत.  

ग्रामपंचायतीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी जी.एम.नांगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सरपंच वाघ यांच्या नावाची सूचना सुनीता पवार यांनी केली तर उपसरपंच हारकाळे यांच्या नावाची सुचना प्रभाकर गडाख यांनी केली.

निवडीनंतर सेवा संस्था अध्यक्ष विश्वास गडाख व अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनिल गडाख यांनी नुतन पदाधिका-यांचा सत्कार केला. प्रकाश शेटे गटाकडून  निवडून आलेल्या एकमेव सदस्य बैठकीस गैरहजर होत्या.

सरपंच धनंजय वाघ हे माजी सरपंच सखाराम वाघ यांचे चिरंजीव आहेत.सोनईचे सरपंचपद सर्वसाधारण साठी खुले होते. या पदासाठी प्रभाकर गडाख, विद्या नितीन दरंदले व नवनाथ दरंदले यांचे नाव चर्चेत होते.

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व पशुसंवर्धन सभापती गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील विकास कामांना अग्रक्रम दिला जाईल. अंतिम टप्प्यात असलेल्या पाणी योजनेचे काम तातडीने पूर्ण केले जाईल, असे सरपंच वाघ यांनी सांगितले.

संपादन - अशोक निंबाळकर 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com