मंत्री तनपुरेंनी घेतली विखे पाटलांच्या व्याह्याची भेट, चर्चेला आलंय उधाण

Dhokne felicitated by Minister Tanpure
Dhokne felicitated by Minister Tanpure

राहुरी : डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे नूतन अध्यक्ष नामदेव ढोकणे यांनी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते पहिला सत्कार स्वीकारला.

"चाय पे चर्चा' करून दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या. 

"तनपुरे'च्या अध्यक्षपदी आज दुपारी निवड झाल्यानंतर सायंकाळी घरी परत जाताना ढोकणे यांची शहरात मंत्री तनपुरे यांच्याशी अचानक भेट झाली.

मंत्री तनपुरे यांनी शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला. दोघांमध्ये "चाय पे चर्चा' घडली. जिल्हा परिषद सदस्य गोविंद मोकाटे, बाजार समितीचे संचालक दत्तात्रेय खुळे, नगरसेवक प्रकाश भुजाडी, एकनाथ तनपुरे उपस्थित होते. 

आमदार विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील परिवर्तन मंडळाच्या ताब्यात तनपुरे कारखाना आहे. अध्यक्ष ढोकणे हे विखे पाटील यांचे व्याही आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे मंत्री तनपुरे यांच्या हस्ते पहिला सत्कार स्वीकारल्याने चर्चेला उधाण आले होते. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com