शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत शालेय शिक्षणमंत्र्यांसोबत चर्चा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 January 2021

अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यांना तात्काळ मान्यता द्याव्यात, आदी मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.

नगर ः शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत शालेय शिक्षणमंत्री बच्चू कडू यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाचे सहकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी भेट घेऊन चर्चा केली. 

या प्रसंगी मांडली. महामंडळाचे मुंबई विभागीय कार्यवाह राजू रणवीर, विनोद गोरे आदी उपस्थित होते. या वेळी झालेल्या चर्चेत 11 डिसेंबर 2020 च्या शिपाई पदाच्या जी. आर. रद्द करावा, दहा, वीस, तीसच्या लाभाबाबत आदेश पारीत करावा, अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ करण्यासाठीचे समितीच्या शिफारशीनुसार अंमलबजावणी करावी, ज्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. 

त्यांना अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यांना तात्काळ मान्यता द्याव्यात, आदी मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. यातील काही मागण्या कडू तातडीने सोडविण्यात येतील, असे आश्‍वासन दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussion with the Minister of School Education regarding the issues of non-teaching staff