नगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळित 

अमित आवारी
Monday, 20 July 2020

महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेची नवीन मुख्य जलवाहिनी आज दुपारी तीनच्या सुमारास पाण्याच्या व हवेच्या दाबाने विळद पंपिंग स्टेशन येथे फुटली. त्या वेळी विळद पंपिंग स्टेशन परिसरात पाऊस सुरू होता. अशा परिस्थितीत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले.

नगर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विळद घाट पंपिंग स्टेशन येथे आज दुपारी जलवाहिनी फुटली. पाऊस सुरू असतानाही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र, हे काम पूर्ण होण्यास अवधी लागणार असल्याने, आगामी दोन दिवस नगर शहरातील विविध भागांचा पाणीपुरवठा विस्कळित राहणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे. 

अवश्‍य वाचा - महापालिकेने नागरिकांकडून घेतला साडेतीन लाखांचा दंड

महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेची नवीन मुख्य जलवाहिनी आज दुपारी तीनच्या सुमारास पाण्याच्या व हवेच्या दाबाने विळद पंपिंग स्टेशन येथे फुटली. त्या वेळी विळद पंपिंग स्टेशन परिसरात पाऊस सुरू होता. अशा परिस्थितीत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. कामास अवधी लागणार असल्याने आज पाणीवाटप सुरू असलेल्या स्टेशन रस्ता परिसराचा पाणीपुरवठा बंद झाल्याने, या भागास उद्या (सोमवारी) नेहमीच्या वेळेत पाणीपुरवठा होईल. सोमवारी (ता. 20) रोटेशननुसार शहराच्या मध्यवर्ती भागातील झेंडी गेट, रामचंद्र खुंट, हातमपुरा, कोठला, मंगल गेट, कचेरी, माळीवाडा आदी भागांसह सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्ता, प्रोफेसर कॉलनी परिसर, प्रेमदान हडको, टीव्ही सेंटर व बुरुडगाव रस्ता भागास पाणीपुरवठा होणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disrupted the city's water supply