सोनईमध्ये सबलाइम इंडिया तर्फे अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप

विनायक दरंदले
Saturday, 14 November 2020

‘सबलाइम इंडिया फॅसिलिटी’तर्फे मुळा साखर कारखान्याच्या ऊसतोडणी कामगारांना, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी अर्सेनिक अल्बम या होमिओपॅथी औषधाचे मोफत वाटप करण्यात आले.

सोनई (अहमदनगर) : ‘सबलाइम इंडिया फॅसिलिटी’तर्फे मुळा साखर कारखान्याच्या ऊसतोडणी कामगारांना, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी अर्सेनिक अल्बम या होमिओपॅथी औषधाचे मोफत वाटप करण्यात आले. 

मुळा कारखान्याच्या कार्यालयात "सबलाइम'चे अध्यक्ष रणजित गोदमगावे, सोनई शाखेचे प्रमुख किरण दरंदले व महेश शेटे यांनी आणलेल्या औषधी गोळ्यांचे सहा हजार संच राळेगणसिद्धीचे सरपंच लाभेश औटी यांच्या हस्ते "मुळा'चे कार्यकारी संचालक सारंगधर ठोंबरे यांच्याकडे देण्यात आले. 

रितेश टेमक, शेतकी अधिकारी विजय फाटके व शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आदिनाथ शेटे उपस्थित होते. कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन, या वर्षी गळीत हंगामासाठी आलेल्या ऊसतोडणी कामगारांची राहण्याची व्यवस्था त्या-त्या गटात सुरक्षित अंतर ठेवून करण्यात आली आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी कारखाना घेतच आहे. औषधाचे वाटप त्यांना लवकरच करण्यात येईल, असे ठोंबरे यांनी सांगितले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of arsenic album tablets by Sublime India in Sonai