एसटी कर्मचाऱ्यांना किराणा किटचे वाटप

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुढाकार
st bus employe
st bus employesakal

श्रीरामपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. प्रारंभी मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, जिल्हा सचिव संजय नवथर, विधानसभा अध्यक्ष संतोष डहाळे, तालुकाध्यक्ष बाबा रोकडे, शहराध्यक्ष नीलेश लांबोळे, विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश दिवसे यांच्या हस्ते पालिका कार्यालयाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर श्रीरामपूर आगारातील १०० कर्मचाऱ्यांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.

शिंदे म्हणाले, की गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शिवजयंतीनिमित्त श्रीरामपूर आगारातील गरजू कुटुंबांना किराणावाटप करून फूल ना फुलाची पाकळी दिली आहे. यापुढे नेवासे व संगमनेर तालुक्यांतील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना किराणा किटचे वाटप करण्यात येणार आहे. याप्रसंगी विशाल शिरसाठ, किशोर वाडिले, बबन माघाडे, भास्कर सरोदे, संतोष भालेराव, दीपक लांडे, नीलेश सोनवणे, दीपक सोनवणे, राजू शिंदे, मनोज जाधव, अरुण बोराडे, राम थोरात, अतुल खरात, महेश कोलते यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते आदींसह एसटी कर्मचारी उपस्थित होते.

जोपर्यंत एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत त्यांना साथ देऊ. झोपी गेलेल्या राज्य सरकारला जागे करण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू.

बाबासाहेब शिंदे, जिल्हाध्यक्ष, मनसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com