राजे शिवाजी पतसंस्थेकडून सभासदांना दिपावलीपूर्वी ४८ लाखाचा लाभांश 

सनी सोनावळे
Friday, 27 November 2020

कान्हुर पठार (ता. पारनेर) येथील राजे शिवाजी पतसंस्थेला या आर्थिक वर्षात १ कोटी ९२ लाख ९० हजार रूपयांचा नफा झाला.

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : कान्हुर पठार (ता. पारनेर) येथील राजे शिवाजी पतसंस्थेला या आर्थिक वर्षात १ कोटी ९२ लाख ९० हजार रूपयांचा नफा झाला संस्थेच्या सभासदांना ११ टक्के लाभांश देण्याचा ठराव संचालक मंडळाने मंजुर केला. त्याप्रमाणे संस्थेच्या ४३१३ सभासदांना ४८लाख ०९हजार ६२९ रुपये लाभांश वाटप केले असल्याचे संस्थेचे अध्यक्ष ॲड आझाद ठुबे यांनी सांगितले.

ठुबे म्हणाले,संस्थेकडे १५० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.९३ कोटी रुपये कर्ज वितरण केलेले आहे. विविध बॅंकांमध्ये संस्थेने ७३ कोटी रूपये गुंतवणुक केलेली आहे.संस्थेला ऑडिट वर्ग 'अ' मिळाला आहे.

संस्थेच्या कान्हुर पठार येथील मुख्यालयासह जवळा, टाकळी ढोकेश्वर, पाडळी दर्या,भाळवणी,सुपा, पारनेर,नगर व शिरुर अशा नऊ ठिकाणी शाखा सुरु असुन कान्हुर पठार मधील मुख्यालयासह टाकळी ढोकेश्वर व जवळा या ठिकाणी संस्थेच्या स्वमालकीच्या इमारती आहेत.

लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या सभेला उपाध्यक्ष शमशुद्दीन इनामदार,उदयकुमार सोनावळे,नंदकुमार ठुबे,विजय काकडे,संतोष ठुबे,भाऊसाहेब नवले,प्रमोद लोंढे, संतोष कोठारी,किशोर शिंदे,साहेबराव जेजुरकर, सारीका पोपळघट,ज्योती ठुबे,संभाजी भालेकर उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dividend of Rs 48 lakh from Raje Shivaji Patsanstha to members before Diwali