esakal | कोरोनाची भीती झुगारुन संगमनेरमध्ये झाली दिवाळी साजरी
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali celebrations were held in Sangamner to allay Corona fears

आठ महिन्यांपासून सर्व सणवार व धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांवर कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर असंख्य बंधने आली होती.

कोरोनाची भीती झुगारुन संगमनेरमध्ये झाली दिवाळी साजरी

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : आठ महिन्यांपासून सर्व सणवार व धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांवर कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर असंख्य बंधने आली होती. सर्वांचाच आवडीचा सण असलेल्या दिवाळीचा संगमनेरकरांनी भीतीचे सावट झुगारुन मोठ्या उत्साहात साजरा केला. 

आठ महिन्यांपासून कोरोना महामारीने जगाला भेडसावले. मोठ्या शहरांपासून अगदी खेड्यापाड्यांपर्यत हा प्रादुर्भाव पोचल्याने, भीतीच्या सावटाखाली गणेशोत्सव, पोळा, नवरात्रोत्सव व दसरा साजरा करण्यात आला. मात्र, गेल्या काही दिवसात सुदैवाने कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याने, जनमाणसातील कोरोनाची भीती काही प्रमाणात नष्ट झाली आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सणांचा राजा दिवाळीसाठी उरली सुरली बंधने झुगारुन विविध प्रकारच्या खरेदीसाठी आठवड्यापासून शहरात गर्दी वाढते आहे. कोरोनाच्या काळातील लॉकडाऊनमुळे व्यापार उद्योगावर आलेली मरगळ या काळात निघून गेली आहे. पूर्वी होणारा सॅनिटायझरचा आग्रह बंद झाल्याचे चित्र सर्वत्र दिसते. दुकानातही नेहमीसारखीच गर्दी झाली होती. कालच्या लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सायंकाळी परंपरेने झालेल्या पूजनानंतर संगमनेरचे आकाश फटाक्‍यांच्या रंगीबेरंगी आतषबाजीने उजळले होते. लोखो रुपयांचे मोठ्या आवाजाचे व धुर व प्रदुषण निर्माण करणारे फटाके फोडल्याने, फटाकेमुक्त दिवाळीचे आवाहन हवेत विरले. 

संपादन : अशोक मुरुमकर