मास्क लावायला सांगितल्याने डॉक्टरलाच मारहाण

विलास कुलकर्णी
Thursday, 10 December 2020

या प्रकरणी एकाविरोधात राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कैलास नारायण जाधव (रा. सात्रळ), असे आरोपीचे नाव आहे

राहुरी : तालुक्‍यातील धानोरे येथे खासगी दवाखान्यात रुग्णाने गोंधळ घातला. डॉक्‍टरने रुग्णाला चेहऱ्यावर मास्क लावण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने रुग्णाने डॉक्‍टरांना शिवीगाळ करून, दवाखान्यातील काचेचा दरवाजा तोडला.

या प्रकरणी एकाविरोधात राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 
कैलास नारायण जाधव (रा. सात्रळ), असे आरोपीचे नाव आहे. मंगळवारी (ता. आठ) रात्री साडेनऊ वाजता धानोरे येथे मीरा नर्सिंग होममध्ये कैलास जाधव पायाचे नख काढण्यासाठी गेला.

तेथे त्याला डॉ. राहुल बोरा यांनी, चेहऱ्याला मास्क लावून येण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने कैलासने डॉक्‍टरांना शिवीगाळ सुरू केली. दवाखान्याच्या काचेच्या दरवाजाला लाथा मारून नुकसान केले. डॉ. बोरा यांच्या फिर्यादीवरून कैलास जाधवविरोधात राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपी पसार आहे. 

अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The doctor was beaten for asking to wear a mask

Tags
टॉपिकस
Topic Tags: