डॉ. नीलेश शेळके यांना पाच दिवस पोलिस कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 December 2020

न्यायालयात त्याला 30 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रेखा जरे हत्येबाबत डॉ. शेळके याची चौकशी केली जाणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी सांगितले. 
 

नगर : शहर सहकारी बॅंकेकडून बोगस कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेऊन बॅंकांची व सहकाऱ्यांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने डॉ. नीलेश शेळके यांना अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 30 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली. 

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी डॉ. नीलेश शेळके यांना काल पुण्यातून अटक केली. शहर सहकारी बॅंकेतील बोगस कर्जप्रकरणी शेळके याच्या सप्टेंबर 2018 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. एकूण 5 कोटी 75 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने काल ताब्यात घेतल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या हवाली केले. आर्थिक गुन्हे शाखेने पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी त्याला आज न्यायालयात हजर केले.

न्यायालयात त्याला 30 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रेखा जरे हत्येबाबत डॉ. शेळके याची चौकशी केली जाणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी सांगितले. 
अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Nilesh Shelke remanded in police custody for five days

Tags
टॉपिकस
Topic Tags: