Shevgaon : शेवगाव घटना; सरकार दोषींवर कारवाई करील - खासदार डॉ. सुजय विखे

पोलिस प्रशासनाला यासाठी काही वेळ देऊन व्यवहार सुरू करावेत, असे आवाहन
dr sujay vikhe over shevgaon riot caste system ahmednagar
dr sujay vikhe over shevgaon riot caste system ahmednagarsakal

शेवगाव : येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. शांतताप्रिय शेवगाव शहराची शांतता व कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्यासाठी काही जातीयवादी प्रवृत्तींकडून नियोजनबद्ध प्रयत्न सुरू होते. त्यामुळे ही घटना घडली. मात्र, सरकार त्यातील दोषींवर कडक कारवाई करील. मात्र, पोलिस प्रशासनाला यासाठी काही वेळ देऊन व्यवहार सुरू करावेत, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.

dr sujay vikhe over shevgaon riot caste system ahmednagar
Ahmednagar : जपानी भाषेमुळे मिळाले २० लाखांचे पॅकेज; ‘संजीवनी’च्या विद्यार्थिनीचा अटकेपार झेंडा

शेवगाव शहरात रविवारी (ता. 14) झालेल्या छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीदरम्यान दगडफेकीच्या घटनेनंतर तीन दिवसांपासून शहर कडकडीत ‘बंद’ आहे. या घटनेतील दोषी व त्यामागील सूत्रधारांना त्वरित अटक करून शहरातील अवैध व्यवसाय बंद करावेत, या मागणीसाठी नागरिक व व्यावसायिकांनी दुकाने व व्यवहार बंद ठेवले आहेत.

या पार्श्वभूमीवर खासदार विखे यांनी शहरातील भगतसिंग चौक येथील हनुमान मंदिरात नागरिक- व्यावसायिकांशी संवाद साधला. यावेळी विखे म्हणाले, की शहरातील शांतता, कायदा- सुव्यवस्था अशाप्रकारे जातीयवाद पसरवून धोक्यात आणणे भविष्यासाठी गंभीर आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार मोनिका राजळे याबाबतच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

dr sujay vikhe over shevgaon riot caste system ahmednagar
Ahmednagar ST Stand : हुश्‍श ! बसस्थानके होणार सुंदर; राज्यात मिळणार दोन कोटींची बक्षिसे

यातील गुन्हेगारांवर व सूत्रधारांवर अधिक कठोर कलमे लावून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी काही कालावधी लागेल. त्यामुळे व्यावसायिकांनी नागरिकांच्या दैनंदिन गरजा, लग्नतिथी व इतर कार्यक्रमांसाठी होणारी गैरसोय टाळावी. यासाठी दुकाने, बाजारपेठ सुरू करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, सुनील रासने, अशोक आहुजा, डॉ. कृष्णा देहाडराय, जगदीश धूत, अमोल सागडे,चंद्रकांत लबडे, नितीन दहिवाळकर, तुषार पुरनाळे, विक्रम दारकुंडे, अमोल घोलप, दत्तात्रय फुंदे आदी उपस्थित होते. सुनील रासने यांनी शहरातील नागरिक व व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत भूमिका मांडली.

dr sujay vikhe over shevgaon riot caste system ahmednagar
Ahmednagar : महावितरणने फोडला जनतेला घाम; नागरिक त्रस्त

दरम्यान, या घटनेत गुन्हा दाखल असलेल्या 13 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, पहिल्या दिवशी 29 जणांना अटक केलेली आहे, तर उर्वरित 70 आरोपींचा पोलिस कसून शोध सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपरिषद यांच्या संयुक्त पथकाने शहरातील तिसगाव रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरवात केली असली, तरी ‘बंद’बाबत नागरिक व व्यावसायिक ठाम आहेत.

शहरातील रुग्णालयात असलेल्या रुग्ण नातलगास डबा देण्यासाठी चाललेला ठाकूर निमगाव येथील युवक अंकुश अशोक पातकळ याच्यावर दगडफेकीदरम्यान हल्ला करण्यात आला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेशी काही संबंध नसताना त्यास हकनाक जखमी करण्यात आले. त्यामुळे तो रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यास योग्य ती मदत व न्याय मिळावा, यासाठी ठाकूर निमगावचे माजी सरपंच गहिनीनाथ कातकडे यांनी खासदार सुजय विखे यांची भेट घेऊन विनंती केली. यावेळी सतीश लांडे, हरीश भारदे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com