esakal | कोरोनाच्या सावटामुळे यंदा अगस्ती आश्रम, अकोले येथील महाशिवरात्रीची यात्रा रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

Due to the corona the Mahashivaratri procession at Agastya Ashram Akole has been canceled this year.jpg

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व शासकीय निर्बंध लक्षात घेता यंदा ही यात्रा रद्द करण्यात आली असल्याचे श्री धुमाळ यांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या सावटामुळे यंदा अगस्ती आश्रम, अकोले येथील महाशिवरात्रीची यात्रा रद्द

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोले (अहमदनगर) : संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अगस्ती आश्रम, अकोले येथील महाशिवरात्रीची (ता.11) मार्च ते (ता.12) मार्च या दोन दिवसांच्या काळात होणारी यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. ही माहिती अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष वकील के.डी.धुमाळ यांनी पत्रकारांना दिली. 

घरफोड्या करणाऱ्या टोळीतील दोघे जेरबंद

ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, अकोले येथे दरवर्षी शिवरात्रीची यात्रा दोन दिवसांची असते आणि किमान चार ते पाच लाख भाविक यात्रेला गर्दी करीत असतात. तथापि सध्या कोरोना डोके वर काढले असल्याने या यात्रेवर नैसर्गिक संकट आले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व शासकीय निर्बंध लक्षात घेता यंदा ही यात्रा रद्द करण्यात आली असल्याचे श्री धुमाळ यांनी स्पष्ट केले.

चोरीच्या वाहनांच्या खरेदी-विक्रिचे मोठे रॅकेट शहरात सक्रिय; पोलिसांची मात्र डोळेझाक

या यात्रेसाठी मुंबई, पुणे, नगर, नाशिक, ठाणे या जिल्ह्याबरोबरच राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. शिवाय मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागातील व्यापारी या यात्रेला आवर्जून आपले सामान विक्रीसाठी आणत असतात.  मात्र यावर्षी तशी स्थिती नसल्याने व्यापाऱ्यांनी व विक्रेत्यांनी आपली खेळणी, प्रसाद, रहाटगाडगे, पाळणे किंवा इतर कोणताही माल विक्रीस आणू नये, असे त्यांनी कळवले आहे.

आंबटशौकिनांसाठी दारूविक्री सुरू; दारूविक्रीच्या निषेधार्थ महिला नेत्याचे अनोखे आंदोलन

शिवाय यात्रेच्या दुसऱ्या दिवशी होणारा राज्यव्यापी कुस्त्यांचा हगामा देखील रद्द करण्यात आला असल्याचेही त्यांनी पत्रकारांना निदर्शनास आणून दिले. 
फक्त शासकीय नियमांच्या अधीन राहून अगस्ती आश्रमातील अगस्ती महाराजांची विधिवत पूजा अर्चा व दर्शन हे उपलब्ध करून दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

महामारी को बीड परिस्थिती ध्यानी घेऊन भाविकांनी यात्रेसाठी येऊ नये, तसेच ट्रस्टला सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष धुमाळ यांचेसह खजिनदार किसनराव लहामगे, विश्वस्त सेक्रेटरी सुधाकर शालिग्राम, ह.भ.प.दीपक महाराज देशमुख, गुलाबराव शेवाळे, परभत नाईकवाडी, व्यवस्थापक रामनाथ मुतडक आदींनी केले आहे.