कर्जत-जामखेडमध्ये आ.रोहित पवारांकडून शैक्षणिक क्रांती

https://www.esakal.com/ahmednagar/police-posts-have-been-vacant-689-villages-ahmednagar-district-five-six-years-416127
https://www.esakal.com/ahmednagar/police-posts-have-been-vacant-689-villages-ahmednagar-district-five-six-years-416127

जामखेड (अहमदनगर) : शिक्षण क्षेत्रात काम करत असताना विद्यार्थी व समाजहित लक्षात घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. त्यासाठी राजकीय दृष्टीकोन न ठेवता विद्यार्थी व शैक्षणिक गुणवत्ता साधली पाहिजे. ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थी शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी आ.रोहित पवार शैक्षणिक क्रांती करण्याचे काम करत आहेत, असे मत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादीचे युवा नेते आ.रोहित पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'फिरते तारांगण' प्रकल्पाचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते मुंबई येथे उद्घाटन झाले यावेळी त्या बोलत होत्या.

कर्जत-जामखेड तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन या विषयात आवड निर्माण व्हावी, यादृष्टीने 'सफर अंतराळाची' तसेच शालेय विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे. यासाठी 'डिजिटल इंटरॅक्टिव क्लासरुम' तयार करण्यात आले आहेत. या प्रकल्पाचाही लोकार्पण सोहळा मुंबई येथे नुकताच पार पडला. कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेद्वारे हे फिरते तारांगण व टेलिस्कोप प्रत्येक शाळेमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.

या तारांगणमध्ये विद्यार्थ्यांना नेहरू तारांगणाप्रमाणे अवकाशाबद्दल रंजक माहिती तसेच टेलिस्कोपद्वारे प्रत्यक्ष ग्रह-तारे बघायला मिळणार आहेत. आपल्या आकाशगंगा, ग्रह, तारे, अंतराळ या सर्व गोष्टींबद्दल उत्कंठा निर्माण होईल आणि भविष्यात या क्षेत्रात विद्यार्थी आपले करियर घडवतील असा आशावाद आ. रोहित पवारांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसह इतर मुलांनाही शाळेत बसून आकाशगंगा पाहावयास मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक दृष्टीकोन व वैज्ञानिक जिज्ञासीवृत्ती जोपासली जाईल. आ.रोहित पवारांनी आपल्या कल्पकतेतून साकारलेल्या या प्रकल्पाचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कौतुक केले. कर्जत जामखेडच्या शैक्षणिक विकासासाठी निवडणुकीपुर्वी दिलेला शब्द आ.पवार यांनी आज खरा करून दाखवला आहे. या प्रकल्प उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यासाठी कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

आणखी २०० डिजिटल इंटरॅक्टिव पॅनल

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने अभ्यासक्रम समजावा आणि त्यांनी डिजिटल शिक्षण आत्मसात करावे, यासाठी कर्जत-जामखेडच्या जिल्हा परिषद शाळांना यापुर्वीही तब्बल २०० डिजिटल इंटरॅक्टिव पॅनल देण्यात आले होते. आता उर्वरीत २०० शाळांमध्येही डिजिटल इंटरॅक्टिव पॅनल देण्यात आले आहेत. आता कर्जत-जामखेडच्या शाळा खऱ्या अर्थाने डिजिटल होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com