Ahmednagar : साडेआठ हजार खटले निकाली, चौदा कोटी वसूल

श्रीगोंदे न्यायालयात लोक अदालत ठरली ऐतिहासिक, एकूण सर्व खटल्यातील १४ कोटी ५५ लाख ४० हजार ८०८ रूपये सामंजस्याने वसूल करण्यात आला.
District Sessions Judge
District Sessions Judge sakal

Shrigonda News - येथील जिल्हा न्यायालयात शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत ८ हजार ६८१ खटले निकाली काढण्यात आले. एकूण सर्व खटल्यातील १४ कोटी ५५ लाख ४० हजार ८०८ रूपये वसुली करण्यात यश आल्याने ही लोक अदालत ऐतिहासिक ठरली.

राष्ट्रीय लोकअदालतीची सुरवात कुकडी प्रकल्पग्रस्तांना वाढीव नुकसान भरपाईची ५ कोटी ५० लाख रुपयांच्या रकमेचा धनादेश वितरण करून करण्यात आला. एकाच वेळी सर्वात जास्त रक्कम वितरीत करुन लोकन्यायालयाचे उदघाटन करण्यात आले.

भु-संपादन, मोटार अपघात, कौटुंबीक वाद, दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे, तसेच ग्रामपंचायत, नगरपालिका, बँक, बी. एस. एन. एल. व महावितरणची प्रकरणे ठेवण्यात आली होती.

खटलापुर्व १० हजार ३५१ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील ७ हजार ९९७ प्रकरणे सामंजस्याने निकाली निघून १ कोटी ५८ लाख ७९ हजार २२९ रूपये वसूल करण्यात आले. तर प्रलंबित २८५० प्रकरणे ठेवून त्यातील ६८४ प्रकरणे निकाली काढून १२ कोटी ९६ लाख ६१ हजार ५७९ रूपये वसूल करण्यात आले.

एकूण सर्व खटल्यातील १४ कोटी ५५ लाख ४० हजार ८०८ रूपये सामंजस्याने वसूल करण्यात आला. लोक न्यायालयासाठी जिल्हा व अति सत्र न्यायाधीश मुजीब शेख, जिल्हा न्यायाधीश एन. शुक्ल, दिवाणी न्यायाधीश जी. एम. साधले,

एन. एस. काकडे, एच. जे. पठाण, के. ए. काटकर, एन. पी. बाजी, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. डी. बी. झराड उपस्थित होते.

District Sessions Judge
Eknath Shinde : भाजप CM शिंदेंना धक्का देण्याच्या तयारीत? शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाच्या हालचाली वाढल्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com