श्रीरामपूर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या निवडणुक जाहीर; 102 प्रभागातुन 281 सदस्य निवडुन येणार

गौरव साळुंके
Monday, 30 November 2020

श्रीरामपूर तालुक्यातील विविध ठिकाणच्या 27 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्यातील विविध ठिकाणच्या 27 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जुलै ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदार यादी कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीमध्ये एकुण 102 प्रभाग असून 281 सदस्य निवडण्यात येणार आहे. त्यात महिला सदस्यांसाठी 154 जागा आरक्षित असून संबधित ग्रामपंचायतीने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीची नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचणयासाठी येथे क्लिक करा
तालुक्यातील गळनिंब, वडाळा महादेव, घुमनदेव, टाकळीभान, ब्राह्मणगाव वेताळ, बेलापूर बू, निपाणी वडगाव, कुरणपूर, कारेगाव, बेलापूर खु, पढेगाव, सराला, गोंडेगाव, मातुलठाण, भेर्डापुर, गोवर्धनपूर, मालुंजा बू, खोकर, महांकाळ वडगाव, नायगाव, मुठेवडगाव, वळदगाव, मांडवे, खानापूर, लाडगाव, एकलहरे आणि मातापूर येथील ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रशासनाने प्रसिद्ध केल्या आहे.

अंतिम प्रभाग रचना गेल्या महिन्यात प्रसिध्द केलेल्या विधानसभा मतदार यादीनुसार मंगळवारी (ता. 1) सर्व तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आणि तहसील कार्यालयासमोरील सुचना फलकांवर प्रसिध्द होणार असल्याची माहिती तहसीलदार पाटील यांनी दिली. प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीसंदर्भात हरकती, सुचना दाखल करण्यासाठी 1 ते 7 डिसेंबर 2020 पर्यंत मुदत आहे. दहा डिसेंबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्यात येणार आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election of 27 Grampanchayats in Shrirampur taluka announced