तनपुरे कारखान्याच्या अध्यक्षपदी ढोकणे यांची निवड

विलास कुलकर्णी
Monday, 17 August 2020

बैठकीस कारखान्याचे मार्गदर्शक व तज्ञ संचालक खासदार डॉ. सुजय विखे पाटील, बाळकृष्‍ण कोळसे, मच्छिंद्र तांबे, केशव कोळसे, उत्तम आढाव, मधुकर पवार, रविंद्र म्हसे, भारत तारडे, नंदकुमार डोळस, हिराबाई चौधरी, शिवाजी गाडे, सुरसिंग पवार, अर्जुन बाचकर, पार्वतीबाई तारडे, विजय डौले, प्रभारी कार्यकारी संचालक भाऊसाहेब सरोदे उपस्थित होते.

राहुरी : डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी नामदेवराव पांडुरंग ढोकणे; तर उपाध्यक्षपदी दत्तात्रेय आसाराम ढूस यांची बिनविरोध निवड झाली. स्वीकृत संचालकपदी सुभाष आप्पासाहेब वराळे (राहुरी) यांची निवड करण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी करून, समर्थकांनी आनंद व्यक्त केला.

अध्यक्षपदाच्या नावाची सूचना मावळते अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी मांडली. त्यास मावळते उपाध्यक्ष शामराव निमसे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदाच्या नावाची सूचना महेश पाटील यांनी मांडली. त्यास अशोक खुरुद यांनी अनुमोदन दिले.
आज (सोमवारी) दुपारी तनपुरे कारखान्याच्या सभागृहात संचालक मंडळाची बैठक झाली.

अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) रामेंद्रकुमार जोशी होते.

हेही वाचा - या गावाला आहेत तीस वेशी

बैठकीस कारखान्याचे मार्गदर्शक व तज्ञ संचालक खासदार डॉ. सुजय विखे पाटील, बाळकृष्‍ण कोळसे, मच्छिंद्र तांबे, केशव कोळसे, उत्तम आढाव, मधुकर पवार, रविंद्र म्हसे, भारत तारडे, नंदकुमार डोळस, हिराबाई चौधरी, शिवाजी गाडे, सुरसिंग पवार, अर्जुन बाचकर, पार्वतीबाई तारडे, विजय डौले, प्रभारी कार्यकारी संचालक भाऊसाहेब सरोदे उपस्थित होते.

अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला. त्यामुळे, निवडणूक निर्णय अधिकारी जोशी यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. स्वीकृत संचालक पदाच्या एका जागेसाठी सुभाष वराळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

संपादन - अशोक निंबाळकर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election of Dhokne as President of Tanpure Factory