निवडणूक अहमदनगर जिल्हा बँकेची, श्रीगोंद्यात तयारी विधानसभेची

Election of District Bank, Preparation of Assembly in Shrigonda
Election of District Bank, Preparation of Assembly in Shrigonda

श्रीगोंदे : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक पुढे ढकलली. अगोदर प्रक्रिया सुरु झाल्यानंतर ठराव करताना इच्छूकांनी ताकत लावली होती. आता निवडणूक होवू शकते अशी परिस्थिती असल्याने पुन्हा एकदा मोर्चेबांधणी सुरु आहे.

दरम्यान तालुक्यातील पक्षीय समीकरणे पुन्हा बदलल्याने जिल्हा बँक निवडणूकीच्या आडून विधानसभा निवडणूकीची गणितेही आखली जावू लागल्याची चर्चा छडू लागली आहे. 

जिल्हा बँक निवडणूक ही कारखानदारांसाठी प्रतिष्ठेची राहते. कारण कारखान्यांचे आर्थिक गणित जिल्हा बँकेतील सत्तेच्या चाव्यांवर अवलंबून असते. गेल्यावेळी मात्र कारखानदारांनी माघार घेत दत्तात्रेय पानसरे व प्रेमराज भोईटे यांच्यात लढत केली. त्यात पानसरे यांनी बाजी मारली होती. राहूल जगताप हे आमदार झाले होते. त्यात दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे व कुंडलिकराव जगताप यांच्यात एकमत झाल्याने नागवडे गटाने यांनी निवडणूक लढवावी असे ठरल्याने भोईटे यांना उमेदवारी दिली. निवडणूकीनंतर स्वीकृत संचालक म्हणून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजेंद्र नागवडे यांची वर्णी लावली.

आता पुन्हा एकदा बँक निवडणूकीची हालचाल सुरु झाली आहे. यावेळी राहूल जगताप विरुध्द दत्तात्रय पानसरे अशी सेवा संस्था मतदारसंघातून निवडणूक होण्याचे निश्चित मानले जाते. सेवा संस्थेचे ठराव करताना या दोघांनी ताकत लावली होती. याही मतदारसंघात नागवडे यांची ताकद चांगली आहे. त्यामुळे त्यांचा उमेदवार कोण याविषयी संभ्रम असला तरी यावेळी नागवडे बेरजेचे राजकारण करणार असल्याची चर्चा आहे.

महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अनुराधा नागवडे यांनी बँकेसाठी उमेदवारी करावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. सेवा संस्था अथवा दुसऱ्या मतदारसंघातून त्यांनी बँकेत जावे असे वरिष्ठांचेही मत असल्याचे समजते. त्यातच शिवाजीराव नागवडे यांच्या त्याच राजकीय वारसदार असतील असे सूचित झाल्याने त्यांना बँकेत जाण्याची गळ घातली जाणार आहे. 

दरम्यान, या सगळ्या घडामोडीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीतच पुढच्या विधानसभेची बीजे रोवली जाणार आहेत. कारण सध्या ज्या पध्दतीने बँक निवडणूकीची तयारी सुरु आहेत. त्यात पानसरे यांनी विधानसभेची तयारी चालवली असल्याचे बोलले जाते. कारण त्यांनी सेवा संस्थेच्या सभासदांची जंत्री सचिवांना मागविण्यास सांगितली आहे. ही तयारी विधानसभेचीच असल्याचे बोलले जाते.

बँकेचा संचालक हा संस्थेच्या अध्यक्षांपुरताच मर्यादीत राहिला आहे. थेट सभासदांपर्यंत जाण्याची त्यांना गरज नसते. मात्र, पानसरे हे त्यांचा कारभार थेट मतदारांना सांगून त्यांना आकर्षित करीत असल्याचे बोलले जाते. त्यातच जगताप व नागवडे हे दोघेही विधानसभेची तयारी करणारच असल्याने बँकेच्या आडून विधानसभेची तयारी सुरु असल्याचे थेट संकेत मिळत आहेत. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com