शिक्षक बँका व पतसंस्थेच्या येणाऱ्या निवडणूकीत समता मंडळ नावानेच रिंगणात उतरणार

आनंद गायकवाड
Wednesday, 18 November 2020

राज्यातील सर्वच शिक्षक बँका, शिक्षक पतसंस्था यांच्या निवडणुका समता मंडळ (पॅनल) या नावानेच स्वबळावर लढवल्या जातील.

संगमनेर (अहमदनगर) : आगामी काळात राज्यातील सर्वच शिक्षक बँका, शिक्षक पतसंस्था यांच्या निवडणुका समता मंडळ (पॅनल) या नावानेच स्वबळावर लढवल्या जातील. हे मंडळ जिंकण्यासाठीच पूर्ण क्षमतेने निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे. जिल्ह्यात एकल शिक्षकांची संख्या पन्नास टक्केपेक्षा जास्त असल्याने, शिक्षक बँकेच्या आगामी निवडणुकीत समता मंडळ विजयी होणार असल्याचा ठाम विश्वास राज्य उपाध्यक्ष मोहन लांडगे यांनी व्यक्त केला. 

संगमनेरात कोविडच्या पार्श्वभुमिवर सर्व नियम पाळून घेण्यात आलेल्या त्रैवार्षिक जिल्हा मेळाव्याच्या ऑनलाईन बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते. या वेळी समता प्राथमिक शिक्षक मंडळ स्थापन करीत असल्याची घोषणा एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंचचे राज्याध्यक्ष एल. पी. नरसाळे यांनी केली. 

यावेळी संगमनेर तालुका एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंचाच्या कार्यकारिणी घोषणा करण्यात आली. या प्रसंगी राज्य सरचिटणीस प्रविण शेरकर, डी. एम. रेपाळे, रावसाहेब दरेकर, जिल्हाध्यक्ष सुभाष तांबे, जिल्हा सरचिटणीस परशुराम आरु, कार्याध्यक्ष सुजित बनकर, प्रसिद्धीप्रमुख आप्पासाहेब बेरड, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष दिपक खेंडके, पारनेर तालुकाध्यक्ष रोहिदास वाबळे आदींसह संगमनेर तालुक्यातील एकल शिक्षक उपस्थित होते. 

संगमनेर तालुका प्राथमिक शिक्षक सेवामंचची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे नंदकिशोर रहाणे ( अध्यक्ष ), हेमंत लोहकरे ( कार्याध्यक्ष ), जिजाभाऊ नेहे ( सरचिटणीस ), प्रकाश भागवत ( कोषाध्यक्ष ), जयराम पावसे ( चिटणीस ), संदीप परबत ( सहसचिव ), सोमनाथ मदने ( प्रसिध्दी प्रमुख ), उपाध्यक्षपदी भाऊसाहेब भागवत, सुनील घुले, बाळासाहेब लांडगे, नानासाहेब देव्हारे, संतोष शेळके, राजेश नवले, गोरक्षनाथ गागरे, संघटकपदी पंढरी उगलमुगले, ज्ञानदेव वावरे, तान्हाजी वाजे, सुभाष गायकवाड, नरेश रागीर, हनुमंता अडांगळे, मनोहर सूर्यवंशी, सोपान शेटे, संतोष उपरे, नानासाहेब देव्हारे, नंदू शिंदे, किरण कटके, प्रदीप राहणे, बाळू जोशी, सूर्यभान म्हस्के, अरुण जाधव, विश्वनाथ वाबळे, वामन खेमनर, सुरेश गुळवे, बाळासाहेब भागवत, लक्ष्मण कोते, गणपत कुऱ्हाडे, बाबासाहेब शिरोळे यांची निवड करण्यात आली.

संगमनेर तालुका समता प्राथमिक शिक्षक मंडळ कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी संतोष कुलाळ, कार्याध्यक्षपदी बाळासाहेब कौटे, सरचिटणीसपदी लक्ष्मण हांडे, सुनील पवार ( कोषाध्यक्ष ), आण्णासाहेब शिंदे ( चिटणीस ), अशोक सोनवणे ( सहसचिव ), ज्ञानदेव दाते ( प्रसिध्दी प्रमुख ) तर उपाध्यक्षपदी सतीश भुतांबरे, तात्याराम गव्हाणे, आप्पासाहेब वाकचौरे, रमेश डोंगरे, बाळासाहेब गायकवाड, फारूक मोमीन यांची तसेच संघटकपदी बाबासाहेब आहेर, रमेश निघुते, अशोक माळी, इग्नाती शेळके, राजेंद्र सोनवणे, भास्कर मोहिते, अरुण कासार, रमेश वाळूंज, वैभव जोशी, बालम शेख, दत्तात्रय दिवेकर, गोरख उगलमुगले, दत्तू मुंढे, विलास साळुंके, भाऊसाहेब रांधवण, बाळासाहेब खताळ, मच्छिंद्र मेढे, रामनाथ तांगडकर, संपत मोरे, मनोहर साळवे, दत्ता वाकचौरे, भाऊसाहेब सुपेकर यांची निवड करण्यात आली. तसेच या वेळी संगमनेर तालुका एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंच महिला आघाडी ( संघटना ) कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

या संघटनेच्या अध्यक्षपदी सुनंदा कानवडे, कार्याध्यक्षपदी दिपाली रेपाळ, सुवर्णा दानवे ( सरचिटणीस ), कल्पना दिवटे ( कार्यालयीन चिटणीस ), मनिषा डोखे ( सहसचिव ), भाग्यश्री बडदे ( प्रसिध्दी प्रमुख ) तसेच उपाध्यक्ष म्हणून मंगल थोरात, सविता राहाणे, वंदना नजन, संगीता डोईफोडे यांची तसेच शर्मिला डावरे, उषा पांगरकर, सुनंदा बोऱ्हाडे, हेमलता काकड, पार्वती गाडेकर, कल्पना कुटे, मुक्ता गाडेकर, प्राजक्ता बेल्हेकर, आशा लांडगे, संगीता पुंडगे, योगिता वडनेरे, कल्पना बिडवे, ज्योती वाघमारे, पद्मा चिंधे यांची संघटकपदी निवय करण्यात आली. 

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्य उपाध्यक्ष मोहनराव लांडगे, जिल्हा उच्चाधिकार कार्याध्यक्ष विलासराव शिरोळे, उत्तर जिल्हा प्रमुख सुरेश भारती, महिला आघाडी जिल्हा कोषाध्यक्षा मुक्ता शिंदे, माजी जिल्हा कार्याध्यक्ष संजय शेंडगे, जिल्हा उपाध्यक्ष पंढरीनाथ थोरात, जिल्हा संपर्क प्रमुख किशोर बिडवे, जिल्हा शिक्षक नेते पी. के. घुले यांनी विशेष परिश्रम घेतले.
 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: elections of teachers banks and credit unions will be held under the name of Samata Mandal