हळगावात कोरोना साखळी तोडण्यास, लसीकरणासाठी भूमिपुत्र तयार

सतराजण दगावल्याने सारेच चक्रावले
कोविड टेस्ट
कोविड टेस्ट ई सकाळ

जामखेड : महिनाभरात हळगावातील चालती-बोलती सतरा माणसं काळाच्या पडद्याआड गेली. गावावर दुःखाचा डोंगर कोसळला, यातून तरुणाईने स्वतःला सावरले अन् "माझं गाव सुरक्षित गाव; एक पाऊल कोरोना मुक्तीकडे " हा संदेश घेऊन कोरोनाची "शृंखला" खंडित करण्याकरिता काम सुरू केलं. पहिलं पाऊल टाकलं अन् गावकऱ्यांच्या कोरोना चाचण्या सुरू झाल्या. दिवसभर आरोग्य विभागाचे पथक येथे कार्यरत होते.

हळगाव (ता.जामखेड ) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत होरपळून निघालंय. येथील ढवळे, पुराणे, कापसे, रंधवे, शेख या आडनावांच्या एकूण सतरा व्यक्तीला या महिन्यात आपला जीव गमवावा लागला. पैकी काहीं कोरोना संसर्ग कमी व्हावा याकरिता रुग्णालयात उपचार घेत होते तर काहींनी खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन कोरोनाची चाचणी करण्याचे टाळले अन घरीच उपचार घेतले. (Everyone in Halgaon will have corona tests)

कोविड टेस्ट
संगमनेरमध्ये जमावाचा पोलिसांवर हल्ला, वाहनांची केली तोडफोड

या सर्वांची प्राणज्योत मालवली. या घटनेने संपूर्ण गावात घबराहट निर्माण झाली आहे. गाव बंदही झाले. मात्र, काही बेफिकीर कोरोना बाधितांचा मुक्तसंचार काही थांबायचे नाव घेईना. येथील निर्माण झालेल्या बिकट स्थितीचे वर्णन करणारी मन हेलाऊन टाकणारी बातमी 'ई सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाल्याने ग्रामसुरक्षा समिती अँक्शन मोडमध्ये आली. अन यापुढे आपल्या गावातल्या एकाही व्यक्तीचा कोरोनामुळे जीव जाऊ द्यायचा नाही, याकरिता त्यांनी काम सुरू केले.

यामध्ये जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, धनंजय ढवळे, शरद ढवळे, राजेंद्र आश्रु ढवळे, अविनाश ढवळे, राजेंद्र हरीभाऊ, अशोक रंधवे, सत्तार शेख, पोलिस पाटील सुरेश ढवळेंच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी गावात निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीवर चर्चा झाली. कोरोनाच्या संकटावर 'एकमुखी' काम करण्याचा निर्णय झाला.

यापुढे येथील ग्रामसुरक्षा समितीने आवश्यकतेनुसार तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, गटविकास अधिकारी पी. पी. कोकणी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे यांचेही मार्गदर्शन घ्यावे, मात्र गावच्या रक्षणासाठी सुरु केलेले काम पुढे जोमाने चालू ठेवावे.

सगळ्या गावाचा लसीकरणाचा खर्च उचलू

" कोरोना संसर्गाने हळगावातील वाढलेला मृत्यूदर लक्षात घेऊन संपूर्ण गावचे लसीकरण प्राधान्याने करण्याची आवश्यकता आहे. शासकीय स्तरावरुन आम्हांला मोफत लस मिळण्यात अडचण असेल तर आपण स्वतः लस विकत घेऊन संपूर्ण गावचे लसीकरण करण्यासाठी योगदान द्यायला तयार आहोत."

- राजेंद्र आश्रू ढवळे, अध्यक्ष-विनफीन फाऊंडेशन, हळगाव.

(Everyone in Halgaon will have corona tests)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com