श्रीगोंदेत शिवसेनाफुटीचे लोण

तीन जणांची हकालपट्टी
Expulsion of three persons from Shiv Sena in Shrigonda
Expulsion of three persons from Shiv Sena in Shrigonda

श्रीगोंदे - शिवसेनेचे माजी तालुका संघटक नंदकुमार ताडे, माजी उपतालुकाप्रमुख संतोष शिंदे व माजी उपशहरप्रमुख समीर काझी यांनी सातत्याने पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने या तिघांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली, अशी माहिती सेनेचे तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांनी दिली.

ही हकालपट्टी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी केल्याचे सांगत दुतारे म्हणाले, की हे तिघे अनेक वर्षांपासून शिवसेनेची फसवणूक करीत आहेत. शिवसेनेचे कुंकू लावून, भगवा पंचा गळ्यात टाकून विरोधी पक्षाशी कायम हातमिळवणी करून स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेना पक्षाचा वापर या लोकांकडून होत आहे, असे वरिष्ठांच्या निदर्शनात आले आहे. जनता उद्धव ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभी राहत असताना, स्वतःला शिवसैनिक म्हणवून घेणारे नंदकुमार ताडे व संतोष शिंदे यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर श्रीगोंदे शहरातील चौकाचौकांमध्ये फटाके वाजवून आनंद व्यक्त केला होता.

दरम्यान, या कारवाईबद्दल ताडे ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले, की त्यांनी हकालपट्टी करण्याचा काही संबंध नाही. आमचीच मूळ शिवसेना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांशी आम्ही बांधील आहोत. त्यामुळे आमची हकालपट्टी केल्याचे जे सांगत आहेत, ते तर खोटे शिवसैनिक आहेत. आता तालुक्यात आम्ही शिवसेना वाढवून दाखवू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com