अमृतवाहिनी पॉलिटेक्निकमध्ये अॉनलाईन प्रवेश सुविधा केंद्र

Facilitation Center at Amrutvahini Polytechnic
Facilitation Center at Amrutvahini Polytechnic

संगमनेर : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षणालयाच्या वतीने अमृतवाहिनी पॉलिटेक्नीकमध्ये सन 2020-21च्या प्रथम व द्वितीय वर्ष प्रवेशासाठी 10 ऑगस्टपासून कोरोनाचे सर्व नियम व सोशल डिस्टंन्सचे पालन करीत, ऑनलाईन प्रवेश सुविधा केंद्र सुरु असणार असल्याची माहिती प्राचार्य व्ही. बी. धुमाळ यांनी दिली.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील अनेक वर्षापासून अमृतवाहिनीत अभियांत्रिकी, एमबीएम व तंत्रनिकेतन, फार्मसी, डी. फार्मसी या अभ्यासक्रमांचे प्रवेश प्रक्रिया केंद्र म्हणून मान्यता मिळालेली आहे.

अमृतवाहिनीतील गुणवत्ता, अद्ययावत प्रयोगशाळा, संगणकीकृत वर्ग, कार्यशाळा, प्रशस्त मैदान, जिमखाना, आधुनिक व दर्जेदार वसतीगृह सुविधा, प्लेसमेंट, सांस्कृतीक महोत्सव यामुळे अमृतवाहिनी हे शिक्षणाचे केंद्र बनले आहे.

या वर्षी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये 416 विद्यार्थ्यांची परिसर मुलाखतीमधून निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी अथवा तत्सम परीक्षेत किमान 35 टक्के गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थी येथील सुविधा केंद्रामार्फत अमृतवाहिनीसह महाराष्ट्रात कोठे ही प्रवेशासाठी पात्र असणार आहेत. 

व्दितीय वर्षाच्या थेट प्रवेशासाठी 12 वी सायन्स, टेक्निकलसह सायन्स अथवा 10 वी नंतर दोन वर्षांचा आयटीआय कोर्स उत्तीर्ण असलेले विद्यार्थी पात्र असणार आहेत. विद्यार्थ्यांना या केंद्रामार्फत त्यांचा कल आणि सध्या मागणी असलेल्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या संधीचा फायदा घेण्यासाठी इच्छुकांनी अमृतवाहिनी सुविधा केंद्रास भेट देऊन ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया पूर्ण करावी. तसेच तज्ज्ञ प्राध्यापकांमार्फत जातीनिहाय संवर्गानुसार आवश्यक कागदपत्र व इतर माहिती केंद्रातून मिळणार आहे.

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com