काळू धरण भरल्याने दोन वर्षांची चिंता मिटली

मार्तंड बुचुडे
Tuesday, 20 October 2020

या परिसरातील पाच गावांची पाणी योजना याच प्रकल्पावर आहे. या परीसरातील सुमार एक हजार हेक्टरहून अधिक शेतीसाठी या लघु पाटबंधारेमधून शेतीसाठी सिंचन योजना राबविण्यात आल्या आहेत . या परीसराला आता किमान दोन वर्ष हे पाणी पुरणार आहे.

पारनेर ः तालुक्यातील ढवळपुरी परीसराला वरदान ठरलेला काळू नदीवरील काळू प्रकल्प यंदा तुडुंब भरला आहे. या प्राकल्पामुळे ढवळपुरी परीसर सुजलाम सुफलाम झाला आहे.

या परिसरातील पाच गावांची पाणी योजना याच प्रकल्पावर आहे. या परीसरातील सुमार एक हजार हेक्टरहून अधिक शेतीसाठी या लघु पाटबंधारेमधून शेतीसाठी सिंचन योजना राबविण्यात आल्या आहेत . या परीसराला आता किमान दोन वर्ष हे पाणी पुरणार आहे.

ढवळपुरी परिसराला वरदान ठरलेला काळू नदीवरील लघु पाटबंधारे विभागाचा हा तलाव आहे. तो काळू प्रकल्प म्हणूनच ओळखला जातो. अतिशय अडचणीतून व मोठ्या कष्टाने हा प्रकल्पाचे काम माजी आमदार (कै.) वसंतराव झावरे यांच्या काळात सुरू झाले. मात्र, अनेक अडथळे सातत्याने येत राहिले. शेवटी हे काम माजी आमदार व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या काळात पुर्णत्वास गेले.

या धरणाच्या मंजूरीपासूनच त्याला अनेक अडथळे येत होते. त्या मुळे याचे काम सुमारे पाच वर्षापेक्षा अधिक काळ सुरू होते. शेवटी या धरणाच्या खर्चाचे बजेटसुद्धा वाढवावे लागले. ते काम औटी यांच्या प्रयत्नातून झाले. शेवटी त्या धरणाचे काम 2010 साली पुर्ण झाले. तेव्हापासून सुमारे चार ते पाच वेळा हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

हे धरण एकदा भरल्यानंतर किमान या परीसराला दोन वर्षासाठी तरी पाण्याची टंचाई भासत नाही. या धरणामुळे या परीसरातील सुमारे एक हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. या धरणावर अनेक शेतक-यांच्या खाजगी वैयक्तिक उपसा जलसिंचन योजना आहेत. त्यातून या परिससरातील एक हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र ओलिताखाली आले आहे. 
या धरणावर ढवळपुरी, भाळवणी, धोत्रे या तीन गावांसह हिवरे कोरडा व चार गावे गोरेगाव, पाडळी, काळकूप व माळकूप या गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत. त्यामुळे हे धरण भरल्यानंतर सलग दोन वर्ष या गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या मिटते. त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

काळू (मध्यम ) लघु पाटबंधारे तलाव.
नदी-काळू 
एकूण पाणीसाठा- 289. दशलक्ष घनफूट.
जिवंत पाणीसाठा- 100 दश लक्ष घनफूट.
मृतसाठा-100 दशलक्ष घनफूट.
एकूण लाभक्षेत्र-2017 हेक्टर.
लाभक्षेत्रातील गावे - ढवळपुरी व धोत्रे. 
प्रकल्प उभारणीचा खर्च-23 कोटी 44 लाख. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers happy with kalu dam filling