सर्पदंश झालेल्या मुलीला सांगितला कोरोना... त्यात तिचा मृत्यू 

शांताराम काळे
Monday, 27 July 2020

दिड महिना उलटूनही मुलीच्या मृत्यूची ना चौकशी ना तक्रारीचा विचार... त्यामुळे मृत अनन्या (५) हिला न्याय मिळण्यासाठी तिचे वडील विश्वास शिंदे व स्वाती शिंदे (रा. शिळवंडी) यांनी तहसीलदार कार्यालय व पोलिस स्टेशनसमोर उपोषण सुरु केले आहे.

अकोले (अहमदनगर) : दिड महिना उलटूनही मुलीच्या मृत्यूची ना चौकशी ना तक्रारीचा विचार... त्यामुळे मृत अनन्या (५) हिला न्याय मिळण्यासाठी तिचे वडील विश्वास शिंदे व स्वाती शिंदे (रा. शिळवंडी) यांनी तहसीलदार कार्यालय व पोलिस स्टेशनसमोर उपोषण सुरु केले आहे.

तालुक्यातील शिळवंडी येथे १० जूनला पाच वर्षाची मुलगी अनन्याला सर्पदंश झाला. त्यानंतर तिला ग्रामीण रुग्णालय कोतुळ येथे नेण्यात आले. तिला आरोग्य कर्मचारी यांनी दाखल करून घेतले. त्यावर उपचार करण्याऐवजी इंजेक्शन व गोळ्या आणण्यास सांगून एक तासानंतर तिला कोरोना आहे, लगेच संगमनेरला हलवा असे सांगण्यात आले. 

हेही वाचा : ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांबद्दल जाणून घ्या; त्यासाठी लागणारे प्रमाणपत्र मिळवा
त्यानंतर १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका आणून कुठलीही सुविधा, डॉकटर न देता त्यांना पाठवण्यात आले. त्यात तिचा दुर्दवी मृत्यू झाला. त्यानंतर दरम्यान आम्ही मुलीला सर्पदंश झाला असल्याचे सांगूनही दुर्लक्ष केले. त्यामुळे मुलीचा मृत्यू झाला. आरोग्य कर्मचारी काही ऐकून घेण्याच्या मनस्थिती नव्हते, संगमनेर येथील शवविच्छेदन अहवालातही सर्पदंश झाल्याचे लिखित असून केवळ कोतुळ आरोग्य कर्मचारी यांच्या न तपासणे व हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाला, असल्याचे निवेदनात म्हटले असून चौकशी समिती नेमून संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृत मुलीच्या आई- वडिलांनी केली आहे. 

हे अन्यायग्रस्त दाम्पत्य अनन्याला न्याय मिळावा म्हणून उपोषणाला बसले आहे. माजी आमदार वैभव पिचड यांनी त्याची भेट घेऊन त्याचे सांत्वन केले. आरोग्य विभागाने चौकशी समिती नेमल्याचे सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले आहे, अशी माहिती मृत मुलीचे वडील विश्वास शिंदे यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोतुळ ग्रामीण रुग्णालय कर्मचारी यांनी सर्पदंश असताना ६७ रुपयाची खोकल्याची औषध बाटली आणण्यास सांगितले. औषध न पाजता तिला कोरोना असल्याचे सांगून १०८ मध्ये कोणतीही सुविधा नसताना पाठविले त्यात संगमनेर येथे तिचा मृत्यू झाला. तर आरोग्य अधिकारी वानखेडे यांची तिचा मृत्यू कोरोनाने मृत्यू झाला, असे मलाही सांगितले. मात्र तिच्या शवविच्छेदन अहवालात. मात्र सर्पदंश झाला असल्याचे नमूद करण्यात आल्याने तालुक्यातील आरोग्य यंत्रणा खिळखिळी झाली आहे. याबाबत मुलीचे वडील यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, विरोधी पक्षनेते, जिल्हा शल्य चिकीत्सक यांनाही पत्रव्यवहार करून ही घटना सांगितली आहे. त्यामुळे चौकशी संती नेमून दोषी वर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

आमदार डॉ. किरण लहामटे म्हणाले, मृत मुलगी अनन्या हिच्या आई वडिलांची माझ्या कामाच्या व्यापामुळे अगोदर भेट घडू शकली नाही. मात्र त्यानंतर स्वतः विश्वास शिंदे यांना ग्रामीण रुग्णालय कोतुळ येथे बोलावून त्यांचे म्हणणे समजावून घेऊन संबंधित दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी बोललो आहे. तातडीने कारवाई करावी, असे आदेश काढण्यास सांगितले आहे. त्या मृत मुलीला व तिच्या आई- वडिलांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fasting in front of tehsil office and police inspector in Akole taluka