योग्य तोडगा न निघाल्याने गांधीजींच्या पुण्यतिथीपासून राळेगणमध्ये उपोषण

Fasting in Ralegan since Gandhiji's death anniversary due to lack of proper settlement
Fasting in Ralegan since Gandhiji's death anniversary due to lack of proper settlement

राळेगणसिद्धी:. गेल्या तीन महिन्यांमहिन्यांत मी पंतप्रधान आणि कृषिमंत्र्यांना पाच वेळा पत्र लिहिले आहे. सरकारचे प्रतिनिधी येथे येऊन चर्चा करत असले तरी आतापर्यंत शेतक-यांच्या मागण्यांवर कोणताही योग्य तोडगा निघालेला नसल्याने महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या दिवशी 30 जानेवारी पासून मी एकटाच राळेगणसिद्धीच्या यादवबाबा मंदिरात उपोषण सुरू करत असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले आहे.

अजूनही कोरोनाची परिस्थिती ठीक नसल्याने कार्यकर्त्यांनी राळेगणसिद्धी येथे गर्दी न करता आपापल्या परिसरात आंदोलन करावे, असे आवाहन हजारे यांनी केले आहे.

हजारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, स्वामिनाथन आयोगानुसार शेतीमालाला हमीभाव मिळावा, केंद्रिय कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तता मिळावी, दूध, फळे, भाजीपाला यांनाही हमीभाव मिळावा यासाठी गेल्या चार वर्षांपासून शेतक-यांच्या प्रश्नांवर मी संघर्ष करीत आलो आहे.

सन २०१८ ला रामलीला मैदान तर जानेवारी २०१९ मध्ये राळेगणसिद्धीत उपोषण केले. पंतप्रधान कार्यालय व केंद्रिय कृषीमंत्र्यांनी लेखी आश्वासन देऊनही त्याचे पालन केलेले नाही. त्यामुळे मागण्यांची पुर्तता व्हावी यासाठी ता. ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धीत उपोषण सुरू करीत आहे. गेल्या 40 वर्षांपासून मी अनेक आंदोलने झाली.

२०११ मध्ये दिल्लीत लोकपाल आंदोलन झाले, ज्यात देशातील लाखो लोक सामील झाले होते. पण कोणीही दगड उगारला नव्हता. आताही कोणत्याही प्रकारे आंदोलनात हिंसाचार होऊ नये. याची कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी. कोरोनाचा धोका अद्याप असल्याने कार्यकर्त्यांनी राळेगणसिद्धीत गर्दी करू नये असे आवाहन हजारे यांनी केले आहे.

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकरी आंदोलनात घडलेल्या हिंसक घटनेने मला दुःख झाले. अहिंसा व शांतता ही या चळवळीची मोठी शक्ती असल्याचे महात्मा गांधीजींनी आम्हाला शिकवले आहे. मला नेहमीच अहिंसक आणि शांततापूर्ण चळवळ हवी आहे.

– अण्णा हजारे , ज्येष्ठ समाजसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com