पैसे मागितल्याने पिता- पुत्राने केली जातीवाचक शिवीगाळ; ऍट्रोसिटी दाखल

Atrocities crime news
Atrocities crime newsesakal

अहमदनगर : बांधकामाचे पैसे मागितल्याचा राग येऊन जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी आरोपी अशोक मुंगसे व त्यांचे दोन मुले तुषार व विकास यांच्यावर लक्ष्मी शाहूराव आरोळे यांच्या फिर्यादीवरुन सोमवारी (ता.21) तोफखाना पोलिस ठाण्यात ऍट्रोसिटीचा (Atrocity) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाकडी दांडक्‍याने केली मारहाण

फिर्यादी लक्ष्मी शाहूराव आरोळे (रा. गांधीनगर बोल्हेगाव) या विधवा असून, त्यांचा मुलगा सचिन आरोळे हा बांधकाम व्यावसायिक आहे. तो बांधकामाचा ठेका घेऊन काम करत असतो. अशोक मुंगसे यांच्या घराचे बांधकाम करण्याचे काम घेतले होते. बांधकाम पूर्ण होण्याच्या स्थितीमध्ये आहे. बांधकामाची काही रक्कम बाकी असल्याने, आरोळे याने अशोक मुंगसे यांच्याकडे पैश्‍यासाठी तगादा लावला होता. परंतु पैसे देण्यास ते टाळाटाळ करीत होते. अशोक मुंगसे आणि त्याचे दोन्ही मुलांनी ता. 16 फेब्रुवारी दुपारी चार वाजता जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले. लाकडी दांडक्‍याने मारहाण केली होती.

Atrocities crime news
अहमदनगर : चेसी चालकाची दुचाकीस्वाराला धडक; दोन जखमी

आरोळे यांनी दिलेल्या फिर्यादीरून पोलिसांनी 16 फेब्रुवारीला अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. आरपीआय (गवई) महिला आघाडीच्या वतीने पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन या प्रकरणात आरोपींवर ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. आरपीआय महिला आघाडीच्या वतीने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश येऊन आरोपींवर ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आघाडीच्या ज्योती पवार, अलका बोर्डे, आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, विजय शिरसाठ, सुयोग बनसोडे, राहुल गायकवाड, संदीप वाघचौरे, सतीश पुंड आदींनी पाठपुरावा केला होता.

Atrocities crime news
दानवेंनी वडापावचे पैसे दिले नाहीत? रोहित पवारांचा मिसळ खाताना टोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com