नगरमध्ये कोरोनाचे पाचाचे झाले पन्नास हजार रूग्ण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

अँटिजेन चाचणीत 249 जण बाधित आढळून आले. त्यांमध्ये महापालिका हद्दीतील 13, अकोले 19, जामखेड 20, कर्जत 20, कोपरगाव 7, नगर ग्रामीण एक, नेवासे 17, पारनेर पाच, पाथर्डी 45, राहाता 19, संगमनेर 47, शेवगाव 11, श्रीगोंदे दहा, श्रीरामपूर 13, तसेच कॅंटोन्मेंटमधील दोन रुग्णांचा समावेश आहे. 

नगर ः जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली, तरी रुग्ण बरे होऊन घरी जाणाऱ्यांचा आलेखही वाढला आहे. काल दिवसभरात 779 जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे आजअखेरपर्यंत 45 हजार 382 घरी परतले आहेत. दिवसभरात 545 रुग्णांची नव्याने भर पडली असून, रुग्णसंख्या कालअखेरपर्यंत 50 हजार 223 झाली आहे. त्यांपैकी 787 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयात चार हजार 54 जणांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्हा रुग्णालयातील तपासणी अहवालात 127 जण बाधित आढळून आले. त्यांमध्ये महापालिका हद्दीतील 58, अकोले 19, जामखेड तीन, कोपरगाव एक, नगर ग्रामीण दहा, पारनेर चार, पाथर्डी दोन, राहुरी एक, शेवगाव आठ, श्रीगोंदे तेरा, श्रीरामपूर एक, कॅंटोन्मेंट दोन, तसेच मिलिटरी हॉस्पिटलमधील पाच रुग्णांचा समावेश आहे. 
खासगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 169 जण बाधित आढळले. त्यांमध्ये महापालिका हद्दीतील 51, अकोले सात, कोपरगाव दोन, नगर ग्रामीण 17, नेवासे 13, पारनेर पाच, पाथर्डी पाच, राहाता 23, राहुरी नऊ, संगमनेर 29, श्रीगोंदे एक, तसेच श्रीरामपूरमधील सात रुग्णांचा समावेश आहे. 

अँटिजेन चाचणीत 249 जण बाधित आढळून आले. त्यांमध्ये महापालिका हद्दीतील 13, अकोले 19, जामखेड 20, कर्जत 20, कोपरगाव 7, नगर ग्रामीण एक, नेवासे 17, पारनेर पाच, पाथर्डी 45, राहाता 19, संगमनेर 47, शेवगाव 11, श्रीगोंदे दहा, श्रीरामपूर 13, तसेच कॅंटोन्मेंटमधील दोन रुग्णांचा समावेश आहे. 

दरम्यान, रुग्णालयातील 779 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यांमध्ये महापालिका हद्दीतील 140, अकोले 79, जामखेड 37, कर्जत 23, कोपरगाव 23, नगर ग्रामीण 31, नेवासे 44, पारनेर 33, पाथर्डी 66, राहाता 82, राहुरी 26, संगमनेर 40, शेवगाव 33, श्रीगोंदे 83, श्रीरामपूर 32, तसेच मिलिटरी हॉस्पिटलमधील सात रुग्णांचा समावेश आहे. 
संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifty thousand corona patients in the ahmednagar