चारशे वर्षांत प्रथमच शनिजयंती साध्या पद्धतीने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

आरती सोहळ्यास आठ पुरोहित, दोन सफाई कामगार, तीन पोलिस, दहा कर्मचारी व दोन विश्वस्त उपस्थित होते. व्यंकटेश राव यांनी पाठविलेल्या ऑनलाइन रकमेतून चौथरा सजावट व पूजेचा सर्व खर्च करण्यात आला. ग्रामस्थ व परिसरातील भाविकांना कळस दर्शन घेऊन माघारी जावे लागले. 
 

सोनई : शनिशिंगणापूर येथे आज चारशे वर्षांनंतर प्रथमच कावड यात्रा, यज्ञ, कीर्तन सोहळा व भाविकांच्या उपस्थितीला फाटा देत पंचवीस जणांच्याच उपस्थितीत शनिजयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा झाला. 

शनिमंदिराचे मुख्य पुजारी अशोक कुलकर्णी यांनी प्रवरासंगम येथून आणलेल्या गंगेच्या पाण्याने सकाळी अकरा वाजता स्वयंभू शनिमूर्तीला स्नान घालण्यात आले. उदासी महाराज मठात अभिषेक झाल्यानंतर दुपारी बारा वाजता स्वयंभू शनिमूर्तीला पंचामृत स्नान, महापूजा व पुरणपोळी-आमरसाचा नैवेद्य दाखविण्यात आला.

हेही वाचा - कोपरगावात संसर्गाचा तिसरा बळी

महंत त्रिंबक महाराज यांच्या हस्ते आरती झाली. शनिमूर्तीला वस्त्र, अलंकार व सोन्याचा मुकुट घातला होता. शनिजयंतीनिमित्त देवस्थान सुरक्षा विभाग व पोलिस यंत्रणेने महाद्वार परिसरात कडक बंदोबस्त लावत भाविक, आजी-माजी विश्वस्त व ग्रामस्थांना प्रवेश दिला नाही.

आरती सोहळ्यास आठ पुरोहित, दोन सफाई कामगार, तीन पोलिस, दहा कर्मचारी व दोन विश्वस्त उपस्थित होते. व्यंकटेश राव यांनी पाठविलेल्या ऑनलाइन रकमेतून चौथरा सजावट व पूजेचा सर्व खर्च करण्यात आला. ग्रामस्थ व परिसरातील भाविकांना कळस दर्शन घेऊन माघारी जावे लागले. 
 
कोरोना हटावच साकडं... 
उदासी महाराज मठात पुरोहित डिगंबर जोशी, गजानन कुलकर्णी, श्रीपाद राजहंस, संजय जोशी, बाळासाहेब जोशी, संकेत जोशी, विशाल कुलकर्णी यांनी देशावरचं कोरोना संसर्गाचं संकट टळावं, म्हणून साडेसाती निवारणाचं साकडं घातलं. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For the first time in four hundred years, Saturn's birthday is celebrated in a simple way