esakal | इतिहासात प्रथमच कुकडीची दोन उन्हाळी आवर्तन... दुसऱ्या आवर्तनाची तारीख ठरल्या रोहित पवारांची माहिती

बोलून बातमी शोधा

For the first time in history, two summer cycles of the Kukdi canal

कुकडी स्थापन झाल्यापासून इतिहासात पहिल्यांदाच उन्हाळ्यातही कुकडीची दोन आवर्तने सुटत आहेत ही देखील जमेची बाजू आहे. तालुक्यात आ.रोहित पवारांच्या नियोजनातून शेतकऱ्यांना आपल्या हक्काचे 'टेल-टू-हेड' पाणी मिळणार आहे.

इतिहासात प्रथमच कुकडीची दोन उन्हाळी आवर्तन... दुसऱ्या आवर्तनाची तारीख ठरल्या रोहित पवारांची माहिती
sakal_logo
By
नीलेश दिवटे

कर्जत: कुकडीचे उन्हाळी आवर्तन सोडण्याबाबत निर्णय झाला आहे. कर्जत-जामखेड तालुक्याचे आमदार रोहित पवार यांनी आवर्तनाबाबत माहिती दिली. कुकडीच्या इतिहासात पहिल्यांदाच उन्हाळ्यात दोन आवर्तन सोडली जाणार आहेत. आमदार पवार यांनी आपले राजकीय वजन वापरून हे आवर्तन सोडण्याचा आग्रह धरला होता.

उन्हाळी आवर्तनाच्या नियोजनासाठी काल  (ता.२९) रोजी पुणे येथील सिंचन भवन येथे  बैठक आयोजित करण्यात आली होती तीत आवर्तनाची तारीख ठरली. या बैठकीसाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील, जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक खलील अन्सारी, कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता हनुमंत धुमाळ, कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे, कुकडी वितरण बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास जगताप, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, माजी आमदार राहुल जगताप आदी उपस्थित होते.

हेही वाचा -मोठी बातमी - नगरमध्ये एकाच कुटुंबातील पाच बाधित, सथ्था कॉलनीत कोरोनाचीच सत्ता

या उन्हाळी आवर्तनासाठी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली होती. त्यानंतर पाणी नियोजनासाठी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात  बैठक होणार असल्याचे सांगितले होते. त्याच अनुषंगाने ही बैठक पार पडली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी येत्या ६ तारखेला आवर्तने सोडण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीत दिली. 

समान पाणीवाटपाचा रोहित पवारांचा आग्रह

या अगोदरही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तालुक्यात पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले होते. कुकडीवर अवलंबून असलेल्या सर्वच तालुक्यांना समान पाणी वाटप व्हावे, असा रोहित पवार यांचा वारंवार आग्रह होता. श्रीगोंदे तालुक्याच्या पाणी नियोजनासाठी माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष घनशाम शेलार यांनी देखील पुढाकार घेतला. सध्या उन्हाळ्याच्या काळात शेती पिकांना पाणी मिळणे गरजेचे आहे. आता या पाण्याचा योग्य वापर करणे शेतकऱ्यांचीदेखील तेवढीच जबाबदारी आहे.

टेल टू हेड आवर्तन

मागील काळात कुकडीच्या पाण्याबाबत केवळ राजकारण झाले. आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे योग्य नियोजनातुन कित्येक वर्षानंतर पाण्याचे नियोजन झाले. घाणीच्या विळख्यात असलेल्या चाऱ्याृ-पोटचाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली. कुकडी अस्तरीकरणाचा प्रश्नही काही प्रमाणात मार्गी लागला आहे. पाण्याचे समान वाटप व्हावे म्हणून स्वयंचलित मीटर बसवण्यात आले. पाणी नियोजनासाठी शेतकर्यासाठी चर्चासत्रे घेण्यात आली. कुकडी स्थापन झाल्यापासून इतिहासात पहिल्यांदाच उन्हाळ्यातही कुकडीची दोन आवर्तने सुटत आहेत ही देखील जमेची बाजू आहे. तालुक्यात आ.रोहित पवारांच्या नियोजनातून शेतकऱ्यांना आपल्या हक्काचे 'टेल-टू-हेड' पाणी मिळणार आहे.

माजी मंत्र्यांचे पाणी आंदोलन
माजी मंत्री राम शिंदे यांच्या हातात सत्ता असताना व मंत्रीमंडळातील मोठी पदे भूषवित असताना मतदारसंघातील लोकांसाठी पाण्याचे नियोजन करता आले नाही. सत्ता गेल्यावर त्याच पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा देणे ही दुटप्पी भुमिका योग्य नाही अशी चर्चा मतदारसंघात दबक्या आवाजात सुरू आहे.