ऐकावे ते नवल... पैठणीचे आमिष दाखवून पाच लाख लुटले 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 June 2020

स्वस्तातील पैठणी साड्यांचे आमिष दाखवून ओगदी शिवारात काल (ता. 15) डहाणू (पालघर) येथील एकाला तब्बल 4 लाख 77 हजार 500 रुपयांना लुटण्यात आले. याबाबत पोलिसांनी विनोद चव्हाण (रा. अनकाई, ता. येवला) याच्यासह 10 ते 12 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. 

कोपरगाव : स्वस्तातील पैठणी साड्यांचे आमिष दाखवून ओगदी शिवारात काल (ता. 15) डहाणू (पालघर) येथील एकाला तब्बल 4 लाख 77 हजार 500 रुपयांना लुटण्यात आले. याबाबत पोलिसांनी विनोद चव्हाण (रा. अनकाई, ता. येवला) याच्यासह 10 ते 12 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. 

हेही वाचा पहिल्याच पावसात रस्त्याची लागली वाट! 

याबाबत विकास आत्माराम पाटील (रा. डहाणू, पालघर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी विनोद चव्हाण याने कॉन्फरन्स कॉलद्वारे विकास पाटील व त्यांच्या ओळखीचे नीलेश राऊत यांच्याशी संपर्क साधला. "येवला येथे या, तुम्हाला अर्ध्या किमतीत पैठणी साड्या घेऊन देतो' असे आमिष दाखवून बोलावून घेतले.

आवश्‍य वाचा शेवगावमध्ये बिबट्याची दहशत 

ओगदी ते बोकटा रस्त्यावर काल (ता. 15) विकास पाटील गेले. आरोपी चव्हाण व त्याच्या साथीदारांनी लाकडी दांडके, चाकूचा धाक दाखवून रोख रक्‍कम व मोबाईल असा 4 लाख 77 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. रात्री उशिरा अपर पोलिस अधीक्षक दीपाली काळे, शिर्डी विभागीय अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, कोपरगाव ग्रामीण पोलिस निरीक्षक अनिल कटके, उपनिरीक्षक सचिन इंगळे यांनी घटनास्थळाला भेट दिली. अहदमनगर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five lakhs were looted