पुणतांब्यात पुन्हा पेटली शेतकरी आंदोलनाची ज्योत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 December 2020

पुणतांबे गावातून शेतक-यांच्या संपाची सुरुवात झाल्याची नोंद जगात झाली आहे. या भागातील शेतकरी जागृत आहेत. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदा पास केला आहे.

पुणतांबे ः  केद्र सरकारने शेतक-यांन बाबत केलेला नवीन कायदा शेतकरी विरोधी आहे. असे म्हणत दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी अंदोलनाला पाठींबा म्हणून येथील शेतकरी आज ग्रामपंचायत समोर असलेल्या शेतकरी पुतळ्यासमोर एकत्र जमले.

या वेळी त्यांनी मोदी सरकारचा निषेध करीत, केंद्र सरकार विरोधी घोषणाबाजी केली. या अंदोलनात कृर्षी कन्या निकीता जाधव. व परीसरातील शेतकरी सामिल झाले होते. त्यांनी हातात फलक घेऊन, शेतक-यांच्या पिकांना हमी भाव मिळावा अशी मागणी केली. 

पुणतांबे गावातून शेतक-यांच्या संपाची सुरुवात झाल्याची नोंद जगात झाली आहे. या भागातील शेतकरी जागृत आहेत. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदा पास केला आहे. यासाठी दिल्लीत शेतक-यांचे अंदोलन सुरु आहे. यासाठी भारत बंद आहे.

या अंदोलनाला पाठिंबा म्हणून आज पुणतांबे दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. किसान क्रांती राज्य समन्वयक धनंजय जाधव, शिवसेना नेते सुहास वहाडणे, चंद्रकांत वाटेकर, आबा नळे, अशोक धनवटे, गणेश बनकर, दादा सांबारे. सह युवकवर्ग यांनी शेतकरी पुतळ्याजवळ येऊन शेतकरी कायदा चुकीचा आहे. या बाबत भाषणे केली.

केंद्र सरकारच्या कृतिबाबत निषेध व्यक्त करीत घोषणाबाजी केली. काही काळ परिसर घोषनांनी निनादला होता. किसन बोरबणे. सर्जेराव जाधव. अरुण बोरबणे आदी मान्यवर उपस्थीत होते. 

 

शेतकरी कायद्याला माझा विरोध नाही. परंतु शेतक-यांच्या पिकाला हमी भाव मिळाला पाहीजे. अतिशय कष्टाने शेतकरी शेतजमिनीत पीक पिकवतो. परंतु पिकाला भाव मिळत नसल्याने शेतक-यांची अर्थीक स्थिती जशी आहे. तशी आहे. कायद्यात सुधारणा करावी.

- डॉ धनंजय धनवटे. लोकनियुक्त सरपंच- पुणतांबे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The flame of the peasant movement re-ignited at Puntamba