
कोरोनाच्या आलेखात चढ-उतार ;शाळा व महाविद्यालयांचा निर्णय लांबणीवर
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाच्या आलेखाचा चढ-उतार सुरू आहे. त्यामुळे शाळा व महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे. जिल्ह्यातील बाधितांचा आकडा एक हजाराच्या घरात असून, जिल्ह्यात अहमदनगर शहराने घेतलेली आघाडी गेल्या काही दिवसांपासून अबाधित आहे.
हेही वाचा: "राहुल गांधी हे फेक गांधी, भाजपचं करतंय महात्मा गांधींच स्वप्न पूर्ण"
जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्यामुळे प्रशासनाने लग्नसमारंभासह इतर कार्यक्रमांवर घातलेले निर्बंध अद्यापही कायम आहेत. हे निर्बंध असतानाही सध्या जिल्ह्यात लग्नसमारंभासह इतर कार्यक्रम धूमधडाक्यात होत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून कारवाई होत असली, तरी ती जुजबी अशल्याचे स्पष्ट होत आहे.जिल्ह्यातील बाधितांच्या आकडेवारीचा २३ जानेवारी ते ३० दरम्यानचा विचार केला, तर हा आकडा कमी-जास्त होत आहे. यामध्ये जिल्ह्यात २५ जानेवारीला सर्वाधिक बाधितांचा आकडा झाला होता. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढतो की काय, अशी भीती होती. मात्र २५ जानेवारीला सर्वाधिक २०४५ बाधितांचा आकडा आल्यानंतर तो कमी झालेला आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात ९०४ बाधित आढळून आले आहेत.
हेही वाचा: कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी 'टनेल मॅन'? वाचा प्रेरणादायी संघर्ष
बाधितांची रविवारची तालुकानिहाय आकडेवारी
नगर शहर : ३०७, राहाता : ८२, संगमनेर : ६२, नगर तालुका : ५७, श्रीरामपूर : ५६, पारनेर : ५३, पाथर्डी : ४९, श्रीगोंदे : ४४, राहुरी : ३८, शेवगाव : ३३, कोपरगाव : ३२, इतर जिल्हा : २४, भिंगार : १८, कर्जत : १२, मिल्ट्रि हॉस्पिटल : १२, अकोलो : १०, नेवासे : नऊ, जामखेड : पाच, इतर राज्य : एक
Web Title: Fluctuations Graph Of Corona Decision Of Schools And Colleges Extension
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..