देवगड देवस्थानची अशीही मानवसेवा

देवगड देवस्थानची अशीही मानवसेवा

नेवासे : "सेवा परमो धर्म' या उक्तीनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजूंच्या मदतीसाठी श्रीक्षेत्र देवगड संस्थानही (ता. नेवासे) सरसावले असून गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या नियोजनाखाली संस्थानने गोशाळांना चारा, गरजूंसाठी सतरा पोती तांदूळ व नगर-औरंगाबाद महामार्गाने मराठवाड्याकडे पायी जाणाऱ्या नागरिकांना अल्पोपाहार देण्यात येत आहे. 

श्रीक्षेत्र देवगड संस्थानतर्फे वाकडी येथील गोशाळेसाठी चारा, तसेच तालुक्‍यातील गरजूंसाठी सतरा पोती तांदूळ तहसीलदार रूपेश सुराणा यांच्याकडे देण्यात आला. तसेच मुंबई- पुण्यासह अन्य ठिकाणांहून मराठवाड्यात आपल्या गावी जाण्यासाठी रात्रंदिवस नगर-औरंगाबाद महामार्गावरून पायी प्रवास करत असलेल्या कामगारांसाठी संस्थानतर्फे पाणी व अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली.

पोलिस व "होम क्वारंटाईन' व्यक्‍तींनाही अल्पोपाहार देण्यात येत आहे. नगर-औरंगाबाद रस्त्यावरील वडाळा बहिरोबा ते प्रवरासंगम गावापर्यंत हा उपक्रम देवगड संस्थानतर्फे राबविण्यात येत आहे. 

"एसआरपी'साठी व्यवस्था 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेवासे तालुक्‍यात बंदोबस्तासाठी आलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या शंभर जवानांना जेवण व राहण्याची व्यवस्था गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी संस्थानच्या यात्री निवासमध्ये केली. 

  • श्रीक्षेत्र देवगड संस्थानतर्फे मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी एक लाखाचा धनादेश देण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या संकटात राष्ट्रीय कार्य समजून मुख्यमंत्री व पंतप्रधान साहाय्यता निधीसाठी, तसेच गावोगावी गरजूंच्या मदतीसाठीही दानशूरांनी पुढे यावे. 
  • - भास्करगिरी महाराज, प्रमुख, श्रीक्षेत्र देवगड संस्थान, ता. नेवासे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com