esakal | साखर कामगारांसाठी गोड बातमी, मागण्यांसाठी नेमली त्रिस्तरीय समिती गठीत
sakal

बोलून बातमी शोधा

Formed a three-tier committee appointed for demands

राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्याबाबत साखर कारखाना मालक प्रतिनिधी, साखर कारखाना कामगार प्रतिनिधी आणि शासन प्रतिनिधी यांची त्रिपक्षीय समिती स्थापन करण्याबाबत कामगार संघटनानी दिलेला मागणी प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

साखर कामगारांसाठी गोड बातमी, मागण्यांसाठी नेमली त्रिस्तरीय समिती गठीत

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे : महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या वेतनवाढीसह इतर मागण्यांवर विचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाने पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांचे अध्यक्षतेखाली साखर कारखाना मालक प्रतिनिधी, साखर कारखाना कामगार प्रतिनिधी आणि शासन प्रतिनिधी अशी त्रिपक्षीय समिती गठीत केली आहे.

नगर जिल्यातील भानुदास मुरकुटे, राजेंद्र नागवडे, अविनाश आदिक,अविनाश आपटे, आनंद वायकर, नितीन पवार या प्रतिनिधिंचा समावेश"

महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी दि.8 जुलै 2015 रोजीच्या शासन निर्णयान्वये त्रिपक्षीय समिती स्थापन करण्यात आली होती. सदर समितीने आपला अहवाल शासनास सादर केल्यानंतर समितीने केलेल्या कराराची अंमलबजावणी करण्याच्या सूचना  दि.12 ऑक्टोबर 2017  रोजीच्या शासन निर्णयान्वये सर्व संबंधितांना देण्यात आल्या होत्या.

सदरहू त्रिपक्षीय समितीने केलेल्या करारनाम्याच्या अंमलबजावणीचा कालावधी 31 मार्च 2019 संपुष्टात आलेला आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्याबाबत साखर कारखाना मालक प्रतिनिधी, साखर कारखाना कामगार प्रतिनिधी आणि शासन प्रतिनिधी यांची त्रिपक्षीय समिती स्थापन करण्याबाबत कामगार संघटनानी दिलेला मागणी प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

राज्यातील कामगार संघटनांनी 30 नोव्हेंबरपासून संपावर जाण्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार यांचे पुढाकाराने राज्य शासनाने तातडीने त्रिपक्षीय समिती गठीत केली आहे, ती अशी ः 

साखर कारखाने मालक प्रतिनिधी

जयप्रकाश साळुखे-दांडेगांवकर, पुर्णा सहकारी साखर कारखाना लि . , पो , बसमतनगर , जि , हिंगोली (अध्यक्ष)
 
श्रीराम सहादू शेटे, कादवा सहकारी साखर कारखाना लि., मातेरेवाडी , ता . दिंडोरी , जि . नाशिक (सदस्य)

आबासाहेब पाटील, रेणा सहकारी साखर कारखाना लि., दिलीप नगर निवाडा , पो . सिंघगांव , ता . रेणापूर , जि . लातूर (सदस्य)

विजयसिंह मोहिते-पाटील ( मा . लोकसभा सदस्य ) , स . म . शंकरराव मोहिते पाटील स . सा . का . लि . , शंकरनगर अकलूज , मु . शंकरनगर , पो . यशवंतनगर , ता . माळशिरस , जि . सोलापूर (सदस्य)

हर्षवर्धन पाटील , कर्मवीर शंकररावजी पाटील स . सा . का . लि . , महात्मा फुले नगर , पो . बिजवडी , ता . इंदापूर , जि . पुणे (सदस्य)

मा.आ. प्रकाश कल्लाप्पाण्णा आवाडे, जवाहर शेतकरी स . सा , का . लि. , कल्लाप्पाण्णा आवाडेनगर, हुपरी - यळगूड, ता . हातकणंगले , जि . कोल्हापूर (सदस्य)

चंद्रदीप नरके , कुंभी कासारी स . सा . का . लि . , कुडीत्रे , ता . करवीर , जि . कोल्हापूर (सदस्य)

राजेंद्र नागवडे , स . म . शिवाजीराव ना . नागवडे स . सा . का . लि . , मु . पो . श्रीगोंदा , जि . अहमदनगर (सदस्य)

माजी आ.भानुदास मुरकुटे , अशोक स . सा . का . लि . , अशोकनगर , ता . श्रीरामपुर , जि.अहमदनगर (सदस्य)

 माजी. आ . श्री . के . पी . पाटील , दुधगंगा वेदगंगा स . सा . का . लि . , बिद्री , पो . बिद्री , ता.कागल , जि . कोल्हापूर (सदस्य)

संजय खताळ, व्यवस्थापकीय संचालक , साखर संघ , मर्या, मुंबई (सदस्य)

बी.बी.ठोंबरे , चेअरमन , नॅशनल शुगर अण्ड अलाईड इंडस्ट्रिज लि . , साईनगर रांजणी , ता . कळंब , जि . उस्मानाबाद (सदस्य)

प्रल्हाद गोविंदराव साळुखे पाटील , चेअरमन , न्यु फलटण शुगर फॅक्टरी , मु . पो . सुरवडी , ता . फलटण , जि . सातारा (सदस्य)

साखर कामगार संघटना प्रतिनिधी

आ. अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप , अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशन (सदस्य)

तात्यासाहेब काळे , अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ(सदस्य)

शंकरराव भोसले , सरचिटणीस , महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ (सदस्य)
 
विनाश आपटे,कार्याध्यक्ष , महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ (सदस्य)

राऊसाहेब पाटील , कार्याध्यक्ष , महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ (सदस्य)

रावसाहेब भोसले , कोषाध्यक्ष , महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ (सदस्य)

अशोक बिराजदार , प्रतिनिधी , महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ (सदस्य)

सुरेश मोहिते , प्रतिनिधी , महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ (सदस्य) 

आनंदराव वायकर , सरचिटणीस , महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ , श्रमिक , टिळक रोड , अहमदनगर(सदस्य)

सुभाष काकुस्ते , सरचिटणीस , महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ , (सदस्य)

अविनाश गोविंदरावजी आदिक ,अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर फेडरेशन,इंटक,श्रीमरापूर (सदस्य)

नितीन बबनराव पवार, सरचिटणीस-महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर फेडरेशन,इंटक,श्रीरामपूर (सदस्य)

पोपटराव मिटकरी , मालेगांव तालुका , राष्ट्रीय शुगर वर्कर्स युनियन , रावळगाव , ता . मालेगांव(सदस्य)

योगेश नामदेव हंबीर , श्रीनाथ मस्कोबा साखर कारखाना , मु . पो . पैठण, ता . दौंड (सदस्य)

डी . डी . वाघचौरे (सदस्य) 


निमंत्रित सदस्य

1) अॅड.भूषण महाडिक , मुंबई (सदस्य)

शासन प्रतिनिधी

साखर आयुक्त,महाराष्ट्र राज्य
2) कामगार आयुक्त,महाराष्ट्र राज्य

सदस्य सचिव...
1) श्री.रविराज इळवे , कल्याण आयुक्त,कामगार कल्याण मंडळ  मुंबई 

सदरहू समिती महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना कामगारांच्या मागण्यांवर विचार करून समिती स्थापन झाल्याच्या दिनांकापासून ६ महिन्याच्या कालावधीत शिफारशींसह शासनास अहवाल सादर करेल.

संपाचा इशारा देताच समिती गठीत

राज्यातील साखर उद्योगातील कामगारांच्या कराराची मुदत 31 मार्च 2019 रोजी संपली आहे. 01 एप्रिलपासून राज्यातील साखर उदयोगातील कामगारांचे वेतनवाढ व सेवा शर्ती ठरविण्यासाठी तातडीने त्रिपक्ष समिती गठीत करून कामगारांना नवीन 40 टक्के वेतनवाढीचा लाभ मिळावा, या मागणी विविध कामगार संघटनांनी केलेली आहे.

कामगार संघटनांनी एप्रिल 2019 मध्येच साखर कामगारांच्या मागण्याची नोटीस राज्य शासनाला दिली आहे. त्याला 17 महिन्याचा कालावधी उलटला तरी ही शासन पातळीवर या मागण्यांबाबद कोणताच निर्णय होत नाही, हे ओळखून राज्यातील साखर कामगार संघटनांनी गळीत हंगाम सुरू असतानाच 30 नोव्हेंबर पासून बेमुदत संपावर  जाण्याचा इशारा दिला होता,तशी नोटीस ही शासनाला देण्यात आली होती. त्यामुळेच शासनाने तातडीने त्रिपक्षीय समिती गठीत केली आहे.

संपादन - अशोक निंबाळकर