पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविण्यासाठी भांडणाऱ्या माजी आमदार पवार यांचे निधन

Former MLA Daulatrao Pawar passes away
Former MLA Daulatrao Pawar passes away

श्रीरामपूर ः येथील माजी आमदार अॅड. दौलतराव मल्हारी पवार (वय ८२) यांचे आज दुपारी येथील कामगार रुग्णालयात अल्प आजाराने निधन झाले.

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. पुणे येथील रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते घरी परतले होते. दरम्यान, त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागल्याने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. तेथे त्यांची प्रकृती आणखी खालावल्याने येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारादरम्यान आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी सुभद्राबाई, चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सुधाकर, अॅड. भागवत, अनिल व डॉ. शरद पवार यांचे ते वडील होत. सन १९८५ साली ते श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

राजकारणासह त्यांनी सहकार आणि कृषी क्षेत्रातही भरीव कार्य केले. सह्याद्री पर्वतरांगेतील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळवावे. तसेच आवर्षणग्रस्त भागाला पाणी पुरवठ्यासाठी त्यांनी विधीमंडळात आवाज उठविला होता.

कालव्यांचे पुनरूज्जीवन केले

येथील प्रवरा नदी पट्यातील लाख कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. ते येथील मुळाप्रवरा वीजसंस्थेचे माजी अध्यक्ष, अशोक साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आणि विचार जागर मंचाचे अध्यक्ष होते.

शेतकरी संघटनांसह श्रीरामपूर जिल्हा कृती समितीसाठी त्यांनी काम केले. उद्या (गुरुवार) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास नेवासे तालुक्यातील पुणतगाव येथील त्यांच्या वस्तीसमोर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com