पारनेरचे राजकारण कुरघोडीचे : सुजित झावरे

सनी सोनावळे
Saturday, 11 July 2020

माजी आमदार (स्व.) वसंतराव झावरे, नंदकुमार झावरे, बाबासाहेब ठुबे यांनी तालुक्‍यातील राजकारणाला एका वेगळ्या उंचीवर नेले होते. विकासासाठी सर्व एकत्र येत असत; आज मात्र एकमेकांवर कुरघोड्या होत असल्याने तालुक्‍याच्या विकासाकडे दुर्लक्ष होते आहे. दुर्दैवाने त्या उंचीचे राजकारण तालुक्‍यात राहिले नाही, अशी खंत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी व्यक्त केली.

टाकळी ढोकेश्वर : माजी आमदार (स्व.) वसंतराव झावरे, नंदकुमार झावरे, बाबासाहेब ठुबे यांनी तालुक्‍यातील राजकारणाला एका वेगळ्या उंचीवर नेले होते. विकासासाठी सर्व एकत्र येत असत; आज मात्र एकमेकांवर कुरघोड्या होत असल्याने तालुक्‍याच्या विकासाकडे दुर्लक्ष होते आहे. दुर्दैवाने त्या उंचीचे राजकारण तालुक्‍यात राहिले नाही, अशी खंत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी व्यक्त केली.

नगरमधील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शिवसेना नगरसेवकांचा राष्ट्रवादी'त प्रवेश व त्यानंतर रंगलेले राजकारण, याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना झावरे बोलत होते. ते म्हणाले, ""तालुक्‍यातील राजकारणामध्ये इतकी ढवळाढवळ होत आहे, की कोण पूर्वाश्रमीचे शिवसैनिक होते आणि कोण खरे शिवसैनिक आहेत, हे जाणण्याचा 
आता जनतेलादेखील वीट आला आहे. हे राजकारण नेमके कोणत्या दिशेला जात आहे? कोणाच्या निष्ठा कोणाकडे आहेत, याचे सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.''  "उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले, की नगरसेवकांच्या पक्षाबाबत मलाही अंधारात ठेवले गेले. यापेक्षा अधिक या विषयावर न बोललेले बरे! आमचा अनेकदा पराभव झाला; मात्र आमची जी नाळ आहे, ती विकासाशी जोडली गेली आहे. तालुक्‍यात कोट्यवधी रुपयांची कामे झाली. त्यामुळे पंधरा वर्षे कोणतीही सत्ता नसताना कार्यकर्त्यांचा संच टिकून आहे, ते त्याचे द्योतक आहे.'' ""या विधानसभेला मी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही. नाही तर तालुक्‍याचे चित्र वेगळे दिसले असते. "मी तालुक्‍याचा मालक आहे,' अशा आविर्भावात कोणी राहू नये. आताचे सुरू असलेले खुजे राजकारण हे मात्र चुकीचे आहे. जनतेला हे राजकारण अपेक्षित नाही. तालुक्‍याने खूप उंचीचे राजकारण पाहिले आह. विकासासाठी एकत्र या. तालुक्‍याच्या पाण्याचा प्रश्नदेखील महत्त्वाचा आहे. तो आपल्याला सोडवायचा आहे,'' असे झावरे यांनी स्पष्ट केले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Zilla Parishad vicepresident Sujit Zavre appeal to speak on Parner development