नेवाशात तीन चोरट्यांसह तीन दुचाकी घेतल्या ताब्यात, कुकाणे पोलिसांची कामगिरी

सुनील गर्जे
Thursday, 17 December 2020

गेल्या एक-दीड महिन्यापासून कुकाणे  व परिसरात दुचाकी चोरी व चोरीचा प्रयत्नाच्या  घटनामुळे दुचाकी चोरांचे आव्हान कुकाणे पोलिसांसमोर होते.

नेवासे :  तालुक्यातील कुकाणे व परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळण्यात कुकाणे पोलिसांना यश आले आहे. पकडलेल्या तीन चोरट्यांकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.  

गेल्या एक-दीड महिन्यापासून कुकाणे  व परिसरात दुचाकी चोरी व चोरीचा प्रयत्नाच्या  घटनामुळे दुचाकी चोरांचे आव्हान कुकाणे पोलिसांसमोर होते.  दरम्यान कुकाणे-चिलेखनवाडी शिवारात असलेल्या हॉटेल यशराज समोरून मंगळवार (ता. १५) रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी रवींद्र विश्वनाथ भारस्कर (वय-४५, रा. तरवडी ता.नेवासे) यांची बजाज कंपनीची प्लॅटिना (विना नंबर)  दुचाकी चोरीला गेली.

हेही वाचा - एकदाच लागवड खर्च, परत फक्त नोटा छापायच्या

दरम्यान, चोरटे यावेळी हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले होते. त्याच रात्री भारस्कार यांनी  कुकाणे पोलिसांत दुचाकी चोरीची तक्रार दिली. 
दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे व नेवासे पोलीस ठाण्याचे प्रभारी, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक अभिनव त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली कुकाणे पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस नाईक किशोर काळे, पोलीस कॉन्स्टेबल नितीन भताणे, अमोल बुचकुल, दिलीप राठोड, आंबादास गीते हे गेल्या दोन दिवसांपासून संशयितांच्या मागावर होते. त्यांनी बुधवारी रात्री रचून सतीश मोहन राशीनकर (वय २४), रवींद्र राजेंद्र सातदिवे (वय २७), अनिल रामभाऊ सातदिवे (वय ३०,  सर्व रा. कारेगाव ता.नेवासे)  यांना ताब्यात घेतले. 

पोलिसांनी या संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून  बाजाज कंपनीच्या दोन व होंडा कंपनीची एक अशा एकूण ६५ हजार रुपये किंमतीच्या  तीन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या.

या प्रकरणी नेवासे पोलिसांत वरील तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. 

राशीनकर अट्टल गुन्हेगार 

यातील सतीश राशीनकर हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात  नेवासे पोलिसांत चोरी, अट्रोसिटी, जबर मारहाण असे विविध पाच-सहा गुन्हे दाखल आहेत. दरम्यान पोलीस तपासात त्याच्याकडून दुचाकी चोरट्यांनी मोठी साखळी उघड होणार आहेत. अनेक दुचाकी चोरीचे गुन्हे उघड होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four bikes seized along with three thieves in Nevasa, Kukane police performance