९, १०, ११, १२ वर्षांच्या चिमुकल्या नवऱ्या, नवरदेवाचे वय विचारू नका! जात पंचायतीची करामत

Four child marriages stopped in Aurangabad district
Four child marriages stopped in Aurangabad district

संगमनेर : ः नगर जिल्ह्यातील भटक्‍या समाजातील अल्पवयीन चार मुलींचे औरंगाबाद जिल्ह्यात होणारे विवाह रोखण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या राज्य सचिव ऍड. रंजना गवांदे यांना यश आले. 

अनेक वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करताना, गवांदे यांनी भटक्‍या समाजातील जातपंचायतींची अनिष्ट प्रथा मोडून काढली. वाड्या-वस्त्यांवर या समाजातील अल्पवयीन मुलींचे विवाह होत असल्याची माहिती गवांदे यांना मिळाली.

औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन येथे विवाह होत असलेल्या दोन मुली शेवगाव तालुक्‍यातील, तर लासूर स्टेशन येथील मुली नेवासे फाटा परिसरातील होत्या. गेल्या गुरुवारी व शुक्रवारी हे विवाह होणार असल्याचे गवांदे यांना समजले. ते थांबविण्यासाठी त्यांनी महिला बालकल्याण विभाग व पोलिसांची मदत घेतली.

या मुली अवघ्या 9, 10, 11 व 13 वर्षांच्या आहेत. संबंधित वाड्या-वस्त्यांवर जाऊन गवांदे यांनी विवाह थांबविल्यानंतर मुलींना त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. या मुलींना बालसुरक्षा समितीपुढे हजर करण्याच्या नोटिसा संबंधित पालकांना बजावल्या आहेत. 

भटक्‍या समाजातील अनिष्ट प्रथा, जातपंचायती बरखास्त करण्यासाठी पुढाकार घेतला; मात्र जातपंचायतींचे तथाकथित पंच खोट्या प्रतिष्ठेसाठी बालविवाहात पुढाकार घेत असल्याची माहिती ऍड. गवांदे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com