प्रवासी साईनगर-पुणे इंटरसिटी रेल्वेच्या प्रतिक्षेत

Four persons have been booked for torturing a minor girl
Four persons have been booked for torturing a minor girl

श्रीरामपूर ः साईनगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरु करण्याची मागणी खासदार सदाशिव लोखंडे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केल्याची माहिती प्रवासी संघटनेचे सचिव येथील अनिल कुलकर्णी यांनी दिली.

नगर जिल्ह्याच्या दृष्टीने पुण्याकडे सकाळी जाणारी व पुणे येथे सकाळी साडेनऊ वाजता पोहचणारी रेल्वेची आवश्‍यकता आहे. एसटी बसने प्रवाशांना पाच ते सहा तास प्रवासासाठी लागतात. त्यामुळे वेळेसह आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. 

वाघोली परिसरात बस व खासगी वाहन प्रवासात एक तास वेळ जातो. त्यामुळे साईनगर पुणे इंटरसिटी रेल्वेगाडी शिर्डीतून सकाळी सहा वाजता सोडल्यास पुणे बायपास मार्गे साडेनऊ वाजता पोहचल्याने अनेक उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी व नोकरदारांची प्रवासाची सोय होणार आहे. त्यामुळे श्रीरामपूर, राहुरी, राहाता, नगर, श्रीगोंदा तालुक्‍यातील शेकडो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

येथील बेलापूर रेल्वे स्थानकावर वाराणसी, हुबळी एक्‍सप्रेस, रेल्वेगाडी म्हैसूर वाराणसी, पुणे नागपूर गरीब रथ रेल्वेगाडीसाठी थांबा देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे नुकतेच पत्र पाठविल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. 

महाएनजीओ फेडरेशनतर्फे डिजिटल साक्षरता कोर्सेस 
येथील महाएनजीओ फेडरेशन, सेवा सहयोग फाऊंडेशन व सोशल रेस्पॉंसीबीलिटी आयोजित मोफत डिजिटल साक्षरता कोर्सेला लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती येथील सुनील साळवे यांनी दिली. डिजिटल साक्षरता अभियानांतर्गत विविध ऑनलाईन कोर्सेस सुरू झाले आहेत. त्यात डिजिटल साक्षरता कोर्स, इंटरनेट बॅंकिंग, डिजिटल मार्केटिंग असे तीन कोर्सेस पाच दिवस रोज एक तास शिकविले जाईल.

सायबर सिक्‍युरिटी तीन दिवस रोज एक तास व मायक्रोसॉफ्ट ऑफिस कोर्स 18 दिवस रोज एक तास शिकवणार आहे. त्यासाठी स्वतःचा कॉम्पुटर अथवा लॅपटॉप आवश्‍यक आहे. सध्या सर्व व्यवहार हे कॉम्प्युटर अथवा ऑनलाईन मोबाईलद्वारे होत आहेत. त्यामुळे येत्या काळात प्रत्येकाला डिजिटल ज्ञान आवश्‍यक आहे. कोर्सेस पूर्ण झाल्यानंतर सहभागींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com