स्त्रीभ्रूण हत्येवर बोबड्या आवाजात बोलणारी चार वर्षाची प्रांजल चमकली सोशल मीडियावर...

pranjal.
pranjal.

अकोले (नगर) : स्त्रीभ्रूण हत्या थांबवा, लेक वाचवा लेक शिकवा, तुम्हाला आई लागते, बहीण लागते, पत्नी लागते मग मुलगी का नको, तिला वाचवा सांभाळा तीच होईल तुमच्या म्हतारपणाची काठी असे बोबड्या आवाजात बोलणारी चार वर्षाची एकपाठी प्रांजल कैलास दुटे ही आदिवासी दुर्गम भाग असलेल्या शेलविहिरे गावातील चिमुरडी सध्या सोशल मीडियावर चमकू लागली आहे. महाराष्ट्रभरातून तिला लोक संपर्क साधून तिचे अभिनंदन करीत आहे. 

अकोले तालुक्यात शेलविहिरे गाव आदिवासी व अतिदुर्गम या गावाला जायचे तर होडीने पिंपरकने पुलाजवळून जावे लागते. या गावात कैलास दुटे यांचे कुटुंब राहते. त्यांना दोन मुली आहेत. एक चार वर्षे वयाची प्रांजल अंगणवाडीत जाते. तिची चुलत बहीण कोमल दुटे एम.ए. शिक्षण घेत असून प्रांजलला लहानपणापासून तीच सांभाळते. तिचे मनन, वाचन व वक्तृत्व याची तयारी करून तिला मार्गदतशन करते. सध्या राज्यात स्त्री भ्रूण हत्या होत असल्याने कोमलने योग्य विषय शोधून प्रांजलला यावर बोलणे शिकवले, आवाजाची चढ उतार, हातवारे, योग्य ठिकाणी थांबणे, तर देशभक्तीपर गाणे, संवाद तिला शिकवले. एकपाठी प्रांजल ते आत्मसात करून एखाद्या वक्त्याला लाजवेल असे संभाषण सादर करत आहे.

सध्या तिच्या प्रबोधनपर क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊन तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. आजूबाजूच्या गावातील लोक तिचे हे प्रबोधन ऐकण्यासाठी उत्सुक असून कॉलेज तरुण तरुणी तिचे चाहते झाले आहेत. राजूर येथे बालचमू एकत्र येत तिचे संभाषण ऐकून आनंदित झाले. अनुष्का कदम हिने तिला शाल गुलाबपुष्प देऊन तिचा सत्कार केला तर कोमलचेही मंजुषा काळे, आरती कदम या तनिष्का महिलांनी प्रांजल व कोमल यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. 

संपादन : सुस्मिता वडतिले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com