
अहमदनगर : व्यवस्थापकाकडून साडेतीन लाखांची फसवणूक
अहमदनगर - कोरोनामुळे आजारी असलेल्या व्यापाऱ्याच्या तीन लाख ६५ हजार ६७ रुपयांच्या मालाची व्यवस्थापनाने परस्पर विल्हेवाट लावली. व्यापारी सचिन प्रेमानंद पाडळे (रा. प्रकाशपूर कॉलनी, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बापू दगडू पवार, त्याची पत्नी शोभा बापू पवार व मुलगा महेश बापू पवार (सर्व रा. निंबळक, ता. नगर) यांच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाडळे यांचे एमआयडीसीमध्ये पर्सिस्ट सेल्स अँड सर्व्हिस नावाचे दुकान आहे. त्यांना मार्च २०२१ मध्ये कोरोनाची बाधा झाली होती. त्यांनी व्यवस्थापकाकडे १४ मार्च २०२१ ते आठ ऑगस्ट २०२१ दरम्यान दुकानाचा ताबा दिला. यानंतर पाडळे ऑगस्ट २०२१ पर्यंत दुकानात आले नव्हते. व्यवस्थापक पवार याने पाडळे यांचा विश्वास संपादन करून व पत्नी शोभा आणि मुलगा महेश यांना हाताशी धरून दुकानातील तीन लाख ६५ हजार ६७ रुपयांचा माल विकून त्यांची फसवणूक केली. पाडळे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Fraud Of 35 Lakh Trader From Manager
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..